राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी.
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी बेताल वक्तव्य करून आमच्या धार्मिक श्रद्धा व भावना भडकवल्या म्हणून त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने जामखेड पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक सोनवलकर याना निवेदन देण्यात आले.यावेळी धारकरी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी भावना दुखावणारे व कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करणारे वक्तव्य केले की, संभाजी भिडे स्वतःला गुरुजी समजतो त्याने हजारो धारकरी पोरं जी आहेत ज्यांना स्वतःची विवेक बुद्धी वापरता येत नाही अशा धारकाऱ्यांना घेऊन तिथे गडकिल्ले मोहीम वगैरे राबवण्याचा त्यांचा काहीतरी प्रकार असतो गडाचं काहीतरी सांगायचं शिवाजी महाराजांचा अर्धवट काहीतरी चुकीचा इतिहास सांगायचा व त्याची माथी भडकविण्याचा कार्यक्रम करायचा त्यांना एक हिंदू आतंकवादी बनवण्याचा तो एक प्रकार आहे धारकरी हे आतंकवाद यांच्या मोडमध्येच जाणारे असतात ते सद्सद्विवेक विचार करणारे नसतात.


या आशयांचे संतापजनक क्लिष्टदायक,बिनबुडाचे व बेताल असे वक्तव्य करून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले संभाजीराव भिडे गुरुजी यांचे विषयी व श्री शिवछत्रपती प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जाणाऱ्या दुर्गप्रेमी धारकऱ्यांविषयी बिनबुडाचे वक्तव्य करून त्यांची आतंकवाद व आतंकवादयांशी तुलना केलेली आहे.
हे वक्तव्य असंख्य धारकरी धर्मबंधू व धारकरी धर्मबंधूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
हे वक्तव्य करणाऱ्या या शरद पवार गटाच्या तथाकथीत प्रदेश प्रवक्त्यावर हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पांडुरंग भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.