Author: Samrudha Nagar

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न समृद्ध नगर न्यूज नेटवर्क- मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने एल्गार पुकारला आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील जामखेड मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जामखेड शहर व तालुक्यातील मराठा बांधवांकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत असून, त्यांच्यासोबत मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी विविध प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी अखंड मराठा समाज जामखेडच्या वतीने नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत मनोज जरांगे…

Read More

कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. ११ : पावसा अभावी शेती तसेच पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत असताना प्रशासनातील प्रत्येक विभागाने संवेदनशीलता आणि समन्वय ठेवून काम करावे. टंचाईग्रस्त गावांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी गावोगावी प्रत्यक्ष दौरे करून नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करावे. योजनांचे काम केवळ नियम अथवा प्रक्रियेच्या अडचणीमुळे प्रलंबित ठेवण्याऐवजी त्यावर व्यवहार्य पर्याय सुचवावेत, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. पाथर्डी नगरपरिषदेच्या कार्यालयात पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा…

Read More

समृद्ध नगर न्यूज नेटवर्क ‘संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या* *संगीत नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती* अहिल्यानगर, दि. २६ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी माऊली सभागृह, अहिल्यानगर येथे ‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. संत कान्होपात्रा यांच्या भक्तिमय जीवनाचा वेध घेणाऱ्या या प्रयोगाला संगीतप्रेमी व नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रसिकांच्या उपस्थितीने सभागृहात संगीत नाट्याचा भक्तिरस अनुभवायला मिळाला.यावेळी नाट्यपरिषदेचे श्री. सतीश लोटके, श्री. श्याम शिंदे तसेच नाट्यपरिषदेचे इतर सदस्य उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा हा…

Read More

अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे नवी दिल्ली येथील ‘इंडिया हॅबिटॅट सेंटर’ येथे दिनांक २४ आणि २५ ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय ‘PMFME कॉन्क्लेव्ह’चे (परिषदेचे) भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत केंद्रस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयमार्फत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी स्वीकारला. या वेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अविनाश जोशी,…

Read More

माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल जवळा, ता. जामखेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळा येथे अत्याधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शाळेचे माजी विद्यार्थी तथा गावचे सुपुत्र प्रशांत मारुती रोडे यांच्या विशेष पुढाकारातून आणि एचपीडी डिझायनिंग कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून शाळेला ६ संगणकांची भेट देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने हा उपक्रम साकारण्यात आला. या संगणक लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक हाताळणी, टायपिंग, डिजिटल अध्ययन, शैक्षणिक सॉफ्टवेअरचा वापर, माहितीचा शोध, शैक्षणिक व्हिडिओ तसेच…

Read More

वृद्ध शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी विशेष प्रक्रिया बोटांचे ठसे न उमटणाऱ्या लाभार्थ्यांनाही मिळणार कर्जमुक्तीचा लाभ समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू असताना वयस्कर तसेच बोटांचे ठसे न उमटणाऱ्या शेतकऱ्यांसमोर येणारे अडथळे दूर करण्यासाठी राज्य शासनाने विशेष प्रक्रिया निश्चित केली आहे. किमान तीन वेळा वेगवेगळ्या बोटांनी प्रमाणीकरणाचा प्रयत्न करूनही आधार प्रमाणीकरण न झाल्यास संबंधित शेतकऱ्याची ओळख तालुकास्तरीय समितीमार्फत निश्चित करून कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. राज्य शासनाने दि. २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय…

Read More

श्रीनागेश्वर पालखी सोहळा जामखेडला उत्साहात संपन्न समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : भक्तिमय वातावरणात टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘हर हर महादेव’, ‘ओम नमः शिवाय’, ‘नागेश्वराय शिव नागेश्वराय’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. शुद्ध वारकरी परंपरेनुसार झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते. नागपंचमीच्या निमित्ताने श्रीनागेश्वर महाराजांची यात्रा भरते. गेल्या २३ वर्षांपासून पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. सकाळी शिवलीलामृत पारायणानंतर नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी, श्री. अमित चिंतामणी, श्री. गोवर्धन जोरे व सौ. मंगलाताई जोरे यांच्या हस्ते श्रीनागेश्वर महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या उपस्थितीत पालखीमध्ये…

Read More

समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सर्वाधिक लाभार्थी जिल्ह्यातील 72 हजार 559 शेतकऱ्यांच्या खात्यात 697 कोटी रुपयांचा निधी वर्ग. आधार प्रमाणीकरणामध्ये राज्यात प्रथम जिल्हा बँकेच्या 65 हजार 656 शेतकऱ्यांचा समावेश इतर बँकेचे 6 हजार 903 शेतकरी आधारी प्रमाणीकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ होऊन पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली. यावेळी पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि आधार प्रामाणित करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क मुंबई, दि. २४ : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार…

Read More

जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : जामखेड शहरातील विश्वक्रांती चौक, बीड रोड येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा शुभारंभ रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या समारंभाचे उद्घाटन प.पू. पांडुरंग (देवा) देशमुख शास्त्री (सौताडा) यांच्या शुभहस्ते होणार असून, विधान परिषद सभापती मा. आ. प्रा. राम शिंदे, आमदार रोहित (दादा) पवार, प्रांजलताई अमित चिंतामणी, तसेच कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय (काका) कोठारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या रुग्णालयात हाडांच्या आजारांवरील विशेष उपचार, अत्याधुनिक एम.आर.आय. सुविधा…

Read More