सरपंच आरक्षण सोडतीने काही खुशी कही गम
जामखेड तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर; इच्छुक लागणार कामाला
जनतेतून सरपंच निवडीमुळे निवडणूका होणार रंगतदार
पुढील ५ महिन्यात ४८ ग्रामपंचायतच्या निवडणुका
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि २३
तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत बुधवारी दि २३ जुलै रोजी तहसीलदार गणेश माळी यांनी जाहीर केले. आरक्षणाने अनेक इच्छुकांना संधी मिळाली तर काहींना धक्का बसला असल्याचे दिसत आहे. सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंचांचे आरक्षण सोडत बुधवारी तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
58 ग्रामपंचायत पैकी 35 गावांमध्ये खुला प्रवर्ग तर नागरिकांचा मागास प्रवर्ग 16 गावासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. 6 जागा या अनुसूचित जाती साठी तर 1 जागा अनुसूचित जमातीसाठी असे आरक्षण सोडत झाली आहे. तहसील कार्यालयामध्ये सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 16 जागा निश्चित झाल्या आहेत. त्यामध्ये अनेकजण आरक्षण सोडतीवर लक्ष ठेवून होते. यावेळी तहसीलदार गणेश माळी, निवासी नायब मच्छिंद्र पाडळे, सचिन आगे, आदींसह विविध गावातील सरपंचपदाचे इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांसाठी ३० जागा राखीव तर सर्वसाधारण साठी २८ जागा ..
अनुसूचित जाती ६ जागांपैकी ३ जागा महिला राखीव तर ३ जागा सर्वसाधारण साठी राखीव आहे. तसेच अनुसूचित जमाती स्री साठी राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी एकूण १६ असून त्यामध्ये महिला ८ ठिकाणी तर उर्वरित ८ जागा सर्वसाधारण साठी राखीव आहे. एकूण सर्वसाधारण ३५ जागा असून यामध्ये १८ स्री तर सर्वसाधारण १७ जागा आहेत.
इच्छुकांचा हिरमोड…
ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती तर अनुसूचित जमाती , नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित झाल्याने तयारी केलेल्या कार्यकर्ते यांचा राजकीय हिरमोड झाला असल्याचे दिसत आहे.काही गावात जैसे थे आरक्षण राहिल्याने पदाधिकारी पुन्हा कामाला लागले आहे. तालुक्यातील काही गावांचा सरपंच पदाचे आरक्षण बदलल्याने हिरमोड झाला आहे. आरक्षण पडलेले पदाधिकारी देखील राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचे दिसत आहे.
सन 2026 तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुका
तालुक्यातील 48 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका सन २०२६ च्या वर्षाच्या सुरुवातीलाच होणार आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांना ५ महिने काम करायला उरले असल्याने पुढील वर्ष सुरू होताच निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे.
तालुक्यातील खालील प्रमाणे आरक्षण
अनुसूचित जाती महिला:
अनु. जाती : एकूण 6 गावे पुढील प्रमाणे – शिऊर, दिघोळ , साकत , पाटोदा, हळगाव,धनेगाव
अनुसूचित जमाती – एकूण 1 – पिंपरखेड
नागरिकांचा मागास प्रवर्ग – एकूण 16 गावे पुढील प्रमाणे – जवळा, झिक्री , बावी , मतेवाडी , वाकी , लोणी, दैवदैठण, अरणगाव, आनंदवाडी, कवडगाव, तेलंगशी , पिंपळगाव आळवा, बोर्ले , सातेफळ, डोणगाव, सारोळा
खुला प्रवर्ग – एकूण 35 गावे पुढील प्रमाणे – पाडळी, घोडेगाव, पिंपळगाव उंडा, नान्नज, सोनेगाव, जवळके, , मोहा, बांधखडक, धानोरा, सावरगाव, आपटी, कुसडगाव, राजेवाडी, चोभेवाडी, गुरेवाडी, पोतेवाडी वाघा, फक्राबाद, आघी, खर्डा, खांडवी, खुरदैठण, चौंडी,जातेगाव, जायभायवाडी, तरडगाव, धामणगाव, धोंडपरगाव, नायगाव, बाळगव्हाण, मुंजेवाडी, मोहरी, रत्नापुर, राजुरी, नाहुली