नान्नज मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
समृध्द नगर न्यूज नेटवर्क —
साठे नगर, नान्नज येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीने साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमात साठे नगर येथील मातंग सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये सुनील साठे, महादेव साठे, दीपक भवाळ, भिवा साठे, संजय साठे, राजेंद्र भगवान साठे,राजू साठे,शिवा साठे, लखन भवाळ,दादा कांबळे व साठे नगरमधील इतर मातंग युवकांचा सक्रिय सहभाग होता.
यावेळी गावातील प्रमुख मान्यवर RPI सुनील साळवे, भाजपा उदय पवार, दादा राजे भोसले, मेजर प्रकाश राऊत, धनुशेठ गावडे, राजू पठाण यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करून, समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन साठे नगर येथील युवा वर्ग व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते.