Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»क्राईम/ गुन्हेगारी»अवैध सावकारांवर धडक कारवाई करा; तक्रारी तातडीने निकाली काढा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
    क्राईम/ गुन्हेगारी

    अवैध सावकारांवर धडक कारवाई करा; तक्रारी तातडीने निकाली काढा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    Samrudha NagarBy Samrudha NagarFebruary 18, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    अवैध सावकारांवर धडक कारवाई करा; तक्रारी तातडीने निकाली काढा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात अवैध सावकारीचा विळखा तोडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. अवैध सावकारांच्या दडपशाहीला बळी न पडता पीडित शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी धाडसाने पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असेही त्यांनी आवाहन केले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत गठीत त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. संबंधित प्रकरणांमध्ये नोटीस पोहोच झाल्याची खात्री करून गुणवत्तेवर निर्णय घ्यावेत, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

    बैठकीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे व अन्य अधिकारी उपस्थित होते. डॉ. आशिया म्हणाले, गरजू नागरिकांनी परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे. जादा व्याज आकारून त्रास दिल्यास सहकार विभागाकडे तक्रार दाखल करावी.

    जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्या २१ सावकारांविरोधात विविध तालुका पोलीस ठाण्यांत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमांतर्गत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १९ अपील प्रकरणांत २५ हेक्टर १५.५ आर जमीन व २,२०० चौ.फुट बांधकाम शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    शासनाने परवानाधारक सावकारांसाठी व्याजदर निश्चित केले असून, शेतकऱ्यांसाठी तारण कर्ज ९ टक्के, विनातारण १२ टक्के; तर बिगरशेतकऱ्यांसाठी तारण १५ टक्के व विनातारण १८ टक्के व्याजदर लागू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
    प्रशासनाच्या या इशाऱ्यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले असून, पुढील काळात जिल्ह्यात मोठी कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.