समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – – देशाच्या शेतीच्या भविष्याची दिशा दाखविणारे बारामतीचे कृषिक प्रदर्शन यंदा आठवडाभर! १७ ते २४ जानेवारी दरम्यान अकरावे कृषि प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर
आज दि. 10 जानेवारी 2026 रोजी कृषक 2026 प्रात्याक्षिके आधारित कृषी प्रदर्शनाबाबत एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. राजेंद्रदादा पवार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. गेली 10 वर्षे बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्रामार्फत कृषिक हे शेतीविषयक प्रदर्शन भरवले जाते. यंदाचे हे ११ वे वर्ष आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १७ जानेवारी रोजी राज्याचे महामहीम राज्यपाल तसेच राज्याचे कृषी मंत्री यांच्या हस्ते होणार असून या प्रदर्शनामध्ये असणा-या प्रमुख आकर्षणाबाबत राजेंद्र पवार यांनी माहिती दिली.

या प्रदर्शनात काय काय पाहाल?
उसाचे प्रती एकरी २०० टन उत्पादन
तसेच खोडव्याचे प्रती एकरी १५० टन उत्पादन
राज्यातील ५ हजार शेतकऱ्यांची AI तंत्रज्ञाना द्वारे ऊसाची लागण
सेन्सार, ड्रोन, रोबोटीक्स, सॅटेलाईट मॅपिंग ,रिमोट सेन्सिंग इ. या तंत्रज्ञानाचा वापर
खत, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता, सुयोग्य काढणी पश्च्यात तंत्रज्ञान, उत्पन्नाचा अंदाज, हवामान बदलानुसार पिक पद्धतीचे नियोजन, बाजारभावाचा अंदाज, जमिनीची उत्पादकता, मातीची गुणवत्ता, रासायनिक खतांचा वापर
जमिनीतील सेन्सर, ड्रोन, रोबोट, व सेटेलाईट द्वारे संपूर्ण प्रक्षेत्राचे नियोजन.
AI आधारित इतर पिकांची प्रात्यक्षिके – केळी, डाळींब, द्राक्ष, तूर, कांदा, कापूस, एरंड, कांद्य
नाविन्यपूर्ण फळझाडांची लागवड
हायड्रोफोनिक भाजीपाला तंत्रज्ञान
भाजीपाला तंत्रज्ञान
परदेशी कटफ्लॉवरची प्रात्यक्षिके
इस्त्राइलमधील ग्रॅविटी ठिबक
रोबोटिक तन नियंत्रण
स्वतंत्र पशुदालन
आधुनिक मशिनरी
नैसर्गिक शेती व होमिओपॅथीच्या शेतीची प्रात्यक्षिके – जीवाणू खते व औषधांचा वापर, १० ड्रम तंत्रज्ञान, दशपर्णी अर्क, जीवामृत, शून्य मशागत तंत्रज्ञानावर आधारित पिके, पिक फेरपालटाचे महत्व, गांडूळखत आणि सेंद्रिय खत निर्मिती, नैसर्गिक शेतीवर आधारित कडधान्ये, भाजीपाला, फळबाग या ठिकाणी पाहावयास मिळेल. शेती क्षेत्रातील होमिओपॅथीचा वापर

दर वर्षी ५ दिवस होणारी अलोट गर्दी पाहून या वेळेस दि. 17-24 जानेवारी 2026 असे 8 दिवसाचे प्रदर्शन भरवण्यात आले असून सर्व शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. राजेंद्र पवार यांच्यातर्फे करण्यात आले.
