Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

    April 12, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026
    Facebook X (Twitter)
    Monday, April 13
    Facebook X (Twitter) Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महत्वाच्या योजने’ला गती‌ !
    ताज्या बातम्या

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महत्वाच्या योजने’ला गती‌ !

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 29, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    जिह्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने’ला गती‌ !

    २ हजार २६८ शेत रस्त्यांचे मजबुतीकरण होणार

    ४ फेब्रुवारीला कामांच्या निविदा प्रसिद्ध होणार

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि.२९ :-

    जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या कामांना वेग आला असून, यासाठी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

    जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार २६८ शेत रस्ते कामासाठी उपलब्ध असून, या प्रक्रियेत जास्तीत जास्त कंत्राटदार व यंत्र मालकांनी आपला सहभाग नोंदवून निविदा भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

    महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या स्वतंत्र योजनेचा मुख्य उद्देश शेत व पाणंद रस्त्यांचे बळकटीकरण करणे हा आहे. हे काम पूर्णपणे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने व जलद गतीने करण्यासाठी सुलभ कार्यपद्धती अवलंबण्यात आली आहे.

    या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती व दहा विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या अनुषंगाने नुकतेच २२ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण सत्रही पार पडले.

    जिल्ह्यात २६ जानेवारी २०२६ पर्यंत बंद असलेले, अतिक्रमित तसेच महसुली कायद्याप्रमाणे मोकळे केलेल्या रस्त्यांची संख्या २ हजार २६८ इतकी आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्ते, शेत रस्ते किंवा पाणंद रस्ते अतिक्रमित असतील, त्यांनी ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी तत्काळ तहसीलदारांशी संपर्क साधावा. तसेच, अतिक्रमण मुक्त व सीमांकन झालेल्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन सदर प्रस्ताव तालुकास्तरावर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.


    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

    April 12, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.