Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

    April 12, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026
    Facebook X (Twitter)
    Monday, April 13
    Facebook X (Twitter) Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»ग्रामीण रुग्णालयांतील अडचणींबाबत आ सुरेश धस यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट.
    ताज्या बातम्या

    ग्रामीण रुग्णालयांतील अडचणींबाबत आ सुरेश धस यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 15, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    ग्रामीण रुग्णालयांतील अडचणींबाबत आ सुरेश धस यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट.

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – ता.15


    आष्टी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयांमधील गंभीर आरोग्यविषयक अडचणींबाबत जिल्हा रुग्णालय बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली, अशी माहिती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे नेते सुरेश धस यांनी दिली.


    ग्रामीण रुग्णालय आष्टी, ट्रॉमा केअर आष्टी, ग्रामीण रुग्णालय पाटोदा तसेच ग्रामीण रुग्णालय शिरूर कासार येथे वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, औषध निर्माता व इतर आवश्यक पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळत नाही. आवश्यक सुविधा असतानाही रुग्णांना खाजगी रुग्णालये व प्रयोगशाळांकडे पाठविले जात असल्याच्या तक्रारी असल्याचे धस यांनी सांगितले.


    महिलांच्या आरोग्य सेवांबाबत गंभीर स्थिती असून वेळेत स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे गर्भवती महिलांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबांना सिझर शस्त्रक्रियेसाठी ₹२५ ते ₹३० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.


    स्टेटमेंट – सुरेश धस:
    “ग्रामीण व सामान्य नागरिकांना शासकीय रुग्णालयांत योग्य, वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. ग्रामीण रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरून सेवा-सुविधा प्रभावीपणे कार्यान्वित कराव्यात, अन्यथा याबाबत जनतेच्या आरोग्यासाठी अधिक तीव्र भूमिका घ्यावी लागेल,” असा इशारा सुरेश धस यांनी दिला.


    दरम्यान, मौजे मानुर जाटवड येथील सर्पदंश झालेल्या मधुकर दादाबा बडे यांची जिल्हा शल्य चिकित्सकांसमवेत भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    दादा, तुम्ही वेळ चुकवलीत…’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट

    January 31, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

    April 12, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.