सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव हुलगुंडे यांचा समाजोपयोगी उपक्रम
निवारा बालगृहातील मुलांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
समृद्ध न्यूज नेटवर्क -: ता.11
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक उद्धव हुलगुंडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडविले. समता भूमी, मोहा फाटा, जामखेड येथील निवारा बालगृहातील अनाथ, वंचित, गोरगरीब, बहुजन व उपेक्षित निराधार बालकांना किराणा व जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत बालगृहातील मुलांना दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, अन्नधान्य व आवश्यक साहित्य देऊन त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यात आली. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी असून वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा संदेश यावेळी देण्यात आले.

या प्रसंगी श्री. उद्धव हुलगुंडे (सोशल मीडिया प्रमुख – सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य, कर्जत-जामखेड तथा भाजपा कर्जत-जामखेड),
मुंबई येथील एस.टी. आगाराचे गोकुळ मिसाळ,
विजय जाधव, रजनीकांत साखरे,
निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजिनाथ केसकर,
शिक्षक समन्वयक संतोष चव्हाण व तुकाराम शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी बालगृह प्रशासनाने या मदतीबद्दल समाधान व्यक्त करत समाजसेवक उद्धव हुलगुंडे यांचे आभार मानले. कार्यक्रमास बालगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
