Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

    April 12, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026
    Facebook X (Twitter)
    Monday, April 13
    Facebook X (Twitter) Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»शिवरायांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जामखेडात स्मारक व्हावे : रोहिणीताई काशिद
    ताज्या बातम्या

    शिवरायांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जामखेडात स्मारक व्हावे : रोहिणीताई काशिद

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 16, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    शिवरायांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जामखेडात स्मारक व्हावे : रोहिणीताई काशिद

    जामखेड शहरात भव्य स्मारक उभारण्याची महिला शिवजन्मोत्सव समितीची मागणी

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – -:

    राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या औचित्याने महिला शिवजन्मोत्सव समिती व शिवप्रेमींच्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौक येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे या मागणीसाठी आज रोजी जामखेड नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले.

    छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्याग, साहस, पराक्रम, दूरदृष्टी, नेतृत्व, न्यायप्रियता, राष्ट्रभक्ती आदी स्वराज्याच्या संकल्पनेने भावी पिढ्यांना त्यांच्या विचारांची प्रेरणा घेता यावी, यासाठी जामखेड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीच्या चौकात छत्रपतींचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने जामखेड नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

    यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणीताई काशिद बोलताना म्हणाल्या की, आज राजमाता जिजाऊंची जयंती आहे. त्यांनी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज असे रत्न घडविले. त्यांच्या विचारांमुळे आज महिलांना समाजामध्ये मान-सन्मानाने राहता येत आहे. राजमाता जिजाऊंच्या विचारांचा आम्ही अभिमानाने स्वीकार करतो आणि भावी पिढीला शिवरायांची प्रेरणा मिळावी यासाठी शहरात भव्य स्मारक व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.

    यावेळी सारोळा गावच्या सरपंच रितुताई काशिद, वैशाली शिंदे, कांचन दाहीतोंडे, सुरेखा आमले, उज्वला खेत्रे, रेणुका टेकाळे, रामकवर कोल्हे, शिवानी कोल्हे, सोनाली मांडवे, प्रणाली कुलकर्णी, सृष्टी काळे,आरती काळे,तनुजा वीर,सिमा सोनार, सरिता काळे, अदिती उबाळे,राधा उबाळे, गौरी जंगम, स्वाती जंगम, शिवानी पाटील,आदिती पाटील,पूनम हावळे, रेश्मा अवसरे,सुरेखा गंडाळ,विद्या भोसले,मंगल निमोणकर,स्वाती झगडे, वैशाली झगडे, सोनिया पाटील,भारती फरांडे,सारीका जाधव आदींसह माहिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    डॉ. हृतिक घोलप एम.डी. (बालरोग) साठी नागपूरमध्ये प्रवेश

    February 20, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

    April 12, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.