Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बारामतीचे कृषिक प्रदर्शन यंदा आठवडाभर!

    January 14, 2026

    सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव हुलगुंडे यांचा समाजोपयोगी उपक्रम.

    January 11, 2026

    खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी.

    January 11, 2026
    Facebook X (Twitter)
    Thursday, January 15
    Facebook X (Twitter) Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»आंतरराष्ट्रीय बातम्या»ताज्या बातम्या»खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी.
    ताज्या बातम्या

    खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 11, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी

    शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी.

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि 11:

    जामखेड नगरपरिषदेच्या प्रारूप विकास आराखड्यात शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खर्डा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी स्वतंत्र जागा आरक्षित करण्यात यावी, अशी मागणी समस्त शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

    जामखेड नगरपरिषदेमार्फत दि. २० डिसेंबर २०२२ रोजी पंचायत समिती सभागृह, जामखेड येथे प्रारूप विकास आराखड्यामध्ये आवश्यक सार्वजनिक सोयी-सुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जामखेड शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी खर्डा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी जोरदार मागणी मांडली होती. त्यानंतर दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी संबंधित खात्यामार्फत यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.

    या निवेदनात जामखेड नगरपरिषदेमार्फत सहाय्यक संचालक, नगररचना अहिल्यानगर यांच्याकडे खर्डा चौक येथील शिवस्मारकासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे काय, याची माहिती देण्यात यावी, तसेच अद्याप आरक्षण झाले नसल्यास संबंधित खात्याशी योग्य तो पत्रव्यवहार करून शहरातील शिवप्रेमी नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत या विषयासंदर्भात संबंधित खात्याशी करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराची माहिती देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

    यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून खर्डा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे, यासाठी समस्त शिवप्रेमी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ही मागणी रास्त असून प्रशासनाच्या माध्यमातून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण नगराध्यक्षा म्हणून प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी शिवप्रेमींना दिले.

    दरम्यान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खर्डा चौक येथे उभारण्यात यावे, जेणेकरून शहरातील व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींच्या भावना आणि निष्ठेचा सन्मान होईल. यासंदर्भात यापूर्वी विधानपरिषद सभापती मा. राम शिंदे साहेब तसेच आमदार रोहितदादा पवार यांनाही निवेदन देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

    याप्रसंगी नगरसेवक अँड. प्रविण सानप, श्रीराम डोके, सूरज काळे, पिंटू डुचे, सचिन देशमुख, गणेश मासाळ, तोरडमल सर, ज्ञानेश्वर भोसले, सुदर्शन फड, जगदीश कानडे, राऊत सर, डॉ. बांगर, योगिता देशमुख, कल्याणी मासाळ, इनामदार ताई, मनीषा बांगर, इंदुताई परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    बारामतीचे कृषिक प्रदर्शन यंदा आठवडाभर!

    January 14, 2026

    सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव हुलगुंडे यांचा समाजोपयोगी उपक्रम.

    January 11, 2026

    जामखेड तालुक्यातील मांजरा नदीवरील मोठ्या पुलासाठी नाबार्डकडून ८ कोटींचा निधी मंजूर

    January 8, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    बारामतीचे कृषिक प्रदर्शन यंदा आठवडाभर!

    January 14, 2026

    सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव हुलगुंडे यांचा समाजोपयोगी उपक्रम.

    January 11, 2026

    खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी.

    January 11, 2026

    बाल वैज्ञानिक प्रदर्शन विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, संशोधन वृत्तीला दिशा देणारे व्यासपीठ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील.

    January 9, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.