Author: Samrudha Nagar

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य देशवासियांसाठी प्रेरणादायी- प्रा. राम शिंदे समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये   समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांचे हे कार्य  संपूर्ण देशवासियांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन  महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. चौंडी येथे लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समिती व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा.शिंदे बोलत होते. यावेळी राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे, बीजमाता राहीबाई पोपेरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, माजीमंत्री अण्णासाहेब…

Read More

ग्रामीण अर्थव्यवस्थेला आर्थिक स्थैर्य व पोषण सुरक्षा देणारी पशुगणना समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पशुपालन ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे लाखो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य आणि पोषण सुरक्षा मिळण्यास मदत होते. पशुपालन हा कृषी कुटुंबासाठी पूरक उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आणि भूमिहिन कुटुंबासाठी उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत आहे. पशुधनाच्या संख्येबाबत सर्वसमावेशक माहिती गोळा करण्यासाठी पशुगणना हे महत्त्वाचे साधन आहे. देशामध्ये १९१९ सालापासून पशुगणनेला सुरुवात करण्यात आली. दर पाच वर्षातून एकवेळेस ही पशुगणना करण्यात येते. आतापर्यंत २० पशुगणना करण्यात आल्या असून २१ व्या पशुगणनेला नोव्हेंबर २०२४ पासून सुरुवात करण्यात आली असून पशुधन क्षेत्र सुधारण्यासाठीच्या कार्यक्रमांचे योग्य नियोजन…

Read More

श्रीगोंदा येथील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची मंत्री निलेश राणेंनी घेतली भेट कुटुंबियांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि.५- श्रीगोंदा येथे झालेल्या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घरी भेट घेवून सांत्वन केले. या संदर्भात उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांचीही त्यांनी भेट घेतली, यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनामार्फत मदतीसाठी तातडीने प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.राणे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, तहसीलदार क्षितिजा वाघमारे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे आदी उपस्थित होते

Read More

बारावी आणि दहावीच्या परीक्षां कॉपीमुक्तच ? कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे…

Read More