Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर कट्टा»शेतकरी कर्जमाफी योजनेतील दोन्ही जाचक अटी हटवल्या, आमदार रोहित पवार यांच्या आदोलनाचे मोठे यश.
    समृद्ध नगर कट्टा

    शेतकरी कर्जमाफी योजनेतील दोन्ही जाचक अटी हटवल्या, आमदार रोहित पवार यांच्या आदोलनाचे मोठे यश.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJuly 10, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    शेतकरी कर्जमाफी योजनेतील दोन्ही जाचक अटी हटवल्या, आमदार रोहित पवार यांच्या आदोलनाचे मोठे यश

    राज्यातील सुमारे ३६ लाख तर कर्जत-जामखेडमधील ६० हजार शेतकऱ्यांना होणार लाभ

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क ता. १० – २०१९ मध्ये ‘महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजने’चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीतून वगळण्याची अट आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी २०२६-२७ सालचं कर्ज नियमित भरण्याची या दोन्ही जाचक अटी काढून टाकल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत केली.

    या जाचक अटी काढून विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर रान उठणवारे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचे मोठे यश असून याचा राज्यातील सुमारे ३६ लाख तर कर्जत-जामखेडमधील सुमारे ६० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

    राज्याला सध्या विरोधी पक्षनेता नसला तरी विरोधी पक्ष नेत्याला साजेशी भूमिका सध्या कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे निभावताना दिसत आहेत. कांदा दरवाढीचे आदोलन असो किंवा विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी त्यांनी दिलेला लढा असो, ही दोनच उदाहरणे त्यासाठी पुरेशी आहेत.

    राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. परंतु यामध्ये अनेक अटीशर्ती टाकल्याने या कर्जमाफीपासून सुमारे ७० टक्के शेतकरी वंचित राहणार असल्याची भूमिका मांडत आमदार रोहित पवार यांनी पहिल्या दिवसापासून याविरोधात आवाज उठवला.

    सुरवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन दिले आणि या योजनेतील जाचक अटी काढून टाकण्याची मागणी केली होती. तसेच नंतर यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावाही केला, परंतु यश येत नसल्याने त्यांनी थेट पंढरपुरात अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उगारले.

    त्यांनी पंढरपुरात तीन दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि हे अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी हे आंदोलन मागे घेतले, परंतु सरकारने दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा शेतकरी एल्गार आंदोलनाची घोषणा केली.

    त्यानुसार दोन आठवड्यांपूर्वी संभाजीनगरमध्ये झालेल्या या एल्गार आदोलनालाही राज्यभरातील हजारो शेतकरी उपस्थित होते. त्यावेळीही मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क साधून मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पंढरपूर येथील आंदोलनात फसवणूक झाल्याचा वाईट अनुभव असतानाही सरकारचा आणि मंत्र्यांचा सन्मान राखण्यासाठी त्यांनी हे आंदोलनही मागे घेतले.

    त्यानंतरी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता त्यांनी कर्जमाफीसाठी नेमलेल्या परदेशी समितीसोबत बैठक घेऊन चर्चा करण्यास सुचवले. त्यानुसार प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेऊन त्यांनी चर्चेसाठी १० जुलै ही तारीख निश्चित केली. परंतु या बैठकीला एकही अधिकारी हजर राहिला नाही.

    याविरोधातही आमदार रोहित पवार यांनी माध्यमांपुढे येऊन सरकारच्या या कृतीचा निषेध केला. त्यानंतर अधिवेशनाच्या एक दिवस आधी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी विधीमंडळात घणाघाती भाषण करुन कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला घेरले आणि सरकार शेतकऱ्यांना कशा प्रकारे फसवत आहे, हे पुराव्यानिशी दाखवून दिले.

    आमदार रोहित पवार यांनी कर्जमाफीच्या विषयावर विधानसभेत केलेल्या आक्रमक भाषणामुळे उघड्या पडलेल्या सरकारचा राजकीय तोटा होणार असल्याचे लक्षात येताच सरकारने याबाबत वेगाने हालचाली सुरु केल्या आणि कोणत्याही अटीशर्ती टाकल्या नसल्याची भूमिका सुरवातीला घेणाऱ्या सरकारला अखेर याबाबत माघ्यार घ्यावी लागली आणि आज विधानसभेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटी वगळण्याची घोषणा केली.

    हा आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचा नैतिक, सैद्धांतिक आणि राजकीय विजय आहे. घोषणा सरकारने केली असली तरी आमदार रोहित पवार यांनी यासाठी केलेले राज्यव्यापी आंदोलन आधीच घराघरात पोचल्यामुळे या कर्जमाफीचे संपूर्ण श्रेय हे आमदार रोहित पवार यांनाच द्यावे लागेल. या यशामुळे त्यांची राजकीय उंचीही निश्चितच वाढणार असून रिझल्ट देणारा एक लढाऊ आमदार अशी प्रतिमा बनण्यास कर्जमाफीच्या या विषयामुळे मदत होणार आहे.

    कर्जमाफी योजनेतील अटी काढल्यामुळं या योजनेतून वंचित राहणाऱ्या राज्यातील सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे. वास्तविक हा निर्णय आधीच व्हायला पाहिजे होता, परंतु त्यासाठी अनेकदा अर्ज-विनंत्या कराव्या लागल्या, पंढरपूर आणि संभाजीनगर येथे आंदोलन करावे लागले. त्यामुळे उशिरा का होईना सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. हे संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचं आणि याबाबत आवाज उठवणारे सर्व नेते, संघटना या सर्वांचं हे यश आहे. या विषयात अहंकार बाजूला ठेवून निर्णय घेण्याची सद्बुद्धी विठुरायाने सरकारला दिली. त्याप्रमाणे निर्णय घेतला, याबाबत सरकारचेही आभार!’’

    • रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)
      ——————————————————

    सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा ही बहुतांश शेतकऱ्यांसाठी घोषणाच होती. त्यामध्ये टाकलेल्या अटीशर्तींमुळे या कर्जमाफीचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळणार नव्हता. परंतु आमच्या कर्जत-जामखेडचा ‘कोहिनूर हिरा’ याने सरकारला या अटीशर्ती काढून टाकण्यास भाग पाडलं. हे संपूर्ण रोहितदादांचं यश आहे. त्यांच्या लढ्यामुळं कर्जत-जामखेडमधील बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.’’

    रघु काळदाते – (ज्येष्ठ नेते, कर्जत)

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई.

    April 19, 2026

    जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

    April 12, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.