Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»Uncategorized»नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून कन्व्हिक्शन रेट वाढवावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    Uncategorized

    नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून कन्व्हिक्शन रेट वाढवावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    Samrudha NagarBy Samrudha NagarMay 23, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    “नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून ‘कन्व्हिक्शन रेट’ वाढवावा”

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगली येथे, ‘सांगली जिल्हा पोलीस’ आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना निर्देश दिले.

    जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी कामगिरी करावी. त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून ‘कन्व्हिक्शन रेट’ वाढवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. खटल्यांमधून आरोपी निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करून, त्यातील त्रृटी दूर कराव्यात. आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलीस ठाण्यांचा आढावा घेत, यातील त्रृटी दूर कराव्यात. त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी. ई-समन्सची नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे वेळ व पैसा वाचतो. सर्व उपाय करून कन्व्हिक्शन रेटचे प्रमाण वाढले पाहिजे.

    मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत केलेला माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना औद्योगिक क्षेत्रातील बंद रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण करून तपासणी करावी. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित पोलीस ठाण्यांना सूचित करावे.”

    बेपत्ता महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचा पूर्ण तपास आणि कार्यवाही होईपर्यंत पाठपुरावा करावा. यासंदर्भात दाखल गुन्हे, त्यातील किती महिला परत आल्या याचे पोलीस ठाणे निहाय ट्रॅकिंग करावे. यासंदर्भात विशेष मोहीम राबवावी. मोटार वाहन कायद्याखालील केसेससाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करा, असे त्यांनी संबंधीतांना सूचित केले.

    दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्याचे व गुन्हे ‘कन्व्हिक्शन रेट’चे प्रमाण वाढवावे, असे सूचित करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन फौजदारी कायद्यांच्या माध्यमातून दोषारोपपत्र दाखल होण्याची गती वाढवावी. 60 ते 90 दिवसात दोषारोपपत्र दाखल करावेत तसेच आरोपीच्या गैरहजेरीमध्येही खटले चालवावेत. नवीन फौजदारी कायद्यामुळे पुरावे स्वीकारार्हतेची कक्षा वाढल्याने त्याचा फायदा घ्यावा. झिरो एफआयआरचे नियमित एफआयआरमध्ये रूपांतरण करावे, असेही ते म्हणाले.

    कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावर्षी 117% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील 2019च्या महापुराचा धोका लक्षात ठेवून, त्याप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, लोकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

    यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026

    कांद्याच्या पिकाच्या आड अफूची शेती! बांधखडक येथे पोलिसांचा छापा; ६ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त २ जणांविरोधात गुन्हा

    March 12, 2026

    शेतीसाठी आता 12 फुटांचा रुंद शेतरस्ते अनिवार्य.ट्रॅक्टर, ट्रॉली, हार्वेस्टरची वाहतूक सुलभ; गावोगावी शेतमार्ग होणार सुरक्षित व दर्जेदार

    January 27, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.