Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»उजनी धरणाचा जलसाठा निम्म्यावर,दौंड ,इंदापूर,कर्जत व करमाळा तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी.
    ताज्या बातम्या

    उजनी धरणाचा जलसाठा निम्म्यावर,दौंड ,इंदापूर,कर्जत व करमाळा तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी.

    Samrudha NagarBy Samrudha NagarMarch 5, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    इंदापूर समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : पुणे, अहिल्यानागरसह सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा जलसाठा निम्म्यावर आला आहे. जसजशा उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत, तशी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढू लागली आहे. उपसा सिंचन, उन्हाळी आवर्तन व पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याच्या व भीमानदीपात्रातून भरमसाठ पाणी सोडण्यात येत आहे .परिणामी, उजनी धरण्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. त्यामुळे उजनी जलाशयातील पाण्याचे तातडीने व काटेकोरपणे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. दरम्यान, दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधी टाहो फोडतात, परंतु यश येत नाही. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार असलेली कालवा सल्लागार समिती नेमके करते काय? याप्रश्नी शेतकरीवर्ग सध्या आक्रमक आहे.


    यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जिरायती भागासह बागायती क्षेत्रातील शेतकरी सुखावला होता. गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरीवर्ग सध्यातरी समाधानी आहे.परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात उजनी धरणाच्या पाणी पातळीत कमलीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणीसाठा पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आला आहे . या परिस्थितीमुळे ऐन उन्हाळ्यात उजनीच्या पाण्याचा उन्हाळा होण्यास उशीर लागणार नाही अशा प्रकारची चिंता उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना वाटत आहे.

    दौंड तालुक्यातील भीमा नदीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने उजनी धरणग्रस्त शेतकरी चिंताग्रस्त आहे . उपसा सिंचन, कालवा सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचे योग्य व फेरनियोजन करणे गरजेचे आहे . याप्रश्नी दौंड ,इंदापूर,कर्जत व करमाळा तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव हुलगुंडे यांचा समाजोपयोगी उपक्रम.

    January 11, 2026

    बाल वैज्ञानिक प्रदर्शन विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, संशोधन वृत्तीला दिशा देणारे व्यासपीठ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील.

    January 9, 2026

    शिक्षिका शोभा डांगे यांना अखेर न्याय, शिवसेना तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश.

    December 29, 2025

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.