Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»संगीत विशारद परीक्षेचा निकाल जाहीर : सारंग ढवळे बनला हळगावमधील पहिला मृदंग विशारद.
    समृद्ध नगर विशेष

    संगीत विशारद परीक्षेचा निकाल जाहीर : सारंग ढवळे बनला हळगावमधील पहिला मृदंग विशारद.

    Samrudha NagarBy Samrudha NagarFebruary 13, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    संगीत विशारद परीक्षेचा निकाल जाहीर : सारंग ढवळे बनला हळगावमधील पहिला मृदंग विशारद.

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि १३  : मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत विशारद परीक्षेतील मृदंग या विषयात सारंग विठ्ठल ढवळे हा उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मृदंग विशारद ही पदवी संपादन करणारा सारंग ढवळे हा हळगावमधील पहिला विद्यार्थी ठरला आहे.

    जामखेड तालुक्यातील हळगाव येथील सारंग ढवळे याने करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयात शिक्षण घेतले आहे. संगीत विशारद नाना पठाडे यांच्याकडे मार्गदर्शनाखाली त्याने मृदंगाचे शिक्षण घेतले. सात वर्षे तो या विषयाचे प्रशिक्षण घेत होता. सलग सात वर्षे परिक्षा दिल्यानंतर त्याने मृदंग विशारद ही पदवी संपादन केली आहे.

    अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने नोव्हेंबर 2024 मध्ये  परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये सारंग ढवळे याने संगीत विशारद परीक्षेत घवघवीत यश संपादन करत मृदंग विशारद ही पदवी संपादन केली आहे.

    सारंग ढवळे हा नगर येथील न्यू लॉ कॉलेज याठिकाणी एलएलबी चे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या मृदंग विषयाच्या परीक्षा दिल्या. त्यात त्याने घवघवीत यश मिळवत मृदंग विशारद ही पदवी संपादन केली.

    भजन, कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताहात सारंग ढवळे याच्या मृदंगाची साथ नामांकित कीर्तनकारांना लाभली आहे.सारंग याची कौटुंबिक पार्श्वभूमी वारकरी परंपरेची आहे. त्याच्या कुटूंबाचा आध्यात्मिक कार्यात नेहमी सहभाग राहिलेला आहे. अध्यात्मिक वातावरणात लहानाचा मोठा झालेल्या सारंगला अध्यात्माची गोडी लागली. विशेषता: अध्यात्मिक संगीताकडे त्याचा कल अधिक राहिला.याच आवडीतून तो आज मृदंग विशारद बनला आहे. त्याच्या घवघवीत यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे व हाळगाव ग्रामस्थांसह जामखेड तालुक्यातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.