Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावोगावी जाऊन काम करावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

    October 1, 2026

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026
    Facebook X (Twitter)
    Thursday, October 1
    Facebook X (Twitter) Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावोगावी जाऊन काम करावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
    समृद्ध नगर विशेष

    दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावोगावी जाऊन काम करावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

    Samrudha NagarBy Samrudha NagarOctober 1, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; जामखेडसाठी उजनीचे अतिरिक्त पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न

    दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावोगावी जाऊन काम करावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

    दुष्काळात नागरिकांना पाणी आणि हाताला काम देण्यासाठी परिपूर्ण नियोजन करा – विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क, दि. १ : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, जामखेड तालुक्यासाठी उजनी धरणातील अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सध्या उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून नागरिक, शेती आणि पशुधनाच्या गरजा लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येतील. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

    दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पाणी आणि हाताला काम उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांचा समन्वय साधून परिपूर्ण दुष्काळ निवारण आराखडा तयार करण्याचे निर्देश विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी दिले.

    पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत व जामखेड तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती तसेच चारा व पाणीटंचाईबाबत आढावा व नियोजन बैठक जामखेड येथे झाली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, आमदार सुनील कर्जतकर, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करा

    पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तत्काळ पूर्ण करावीत. उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे. गावागावातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात.

    पशुधनासाठी चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करावे. पहिल्या टप्प्यात डिसेंबरपर्यंत आवश्यक असलेल्या चाऱ्याचे नियोजन पूर्ण करावे. दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतर होऊ नये, यासाठी रोजगाराच्या कामांची संख्या वाढवावी. रोजगाराच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर नागरिकांना काम उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे

    दुष्काळ तसेच शेतीच्या नुकसानीच्या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतीचे सरसकट पंचनामे करण्यात येणार असून कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

    मागील वर्षी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या वीज खांबांची तसेच डीपीची कामे महावितरणने तातडीने पूर्ण करावीत. दुष्काळाच्या परिस्थितीत वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

    अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन समस्या जाणून घ्याव्यात

    दुष्काळाच्या परिस्थितीत अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. गावागावात भेटी देऊन शेतकरी व नागरिकांशी संवाद साधावा आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात. कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

    पाणी आणि रोजगाराचे नियोजन आवश्यक – प्रा. राम शिंदे

    विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण)’ योजनेअंतर्गत कामांची व्याप्ती वाढवून अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून द्यावा. जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत. पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना थेट डीबीटीद्वारे निधी देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. गावागावातील मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी दिले.

    नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यावर भर

    विधान परिषद सदस्य सुनील कर्जतकर म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत शासन संवेदनशीलपणे काम करीत असून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात.

    बैठकीत कर्जत व जामखेड तालुक्यातील पाणीपुरवठा, चारा, रोजगार, वीजपुरवठा, अपूर्ण पाणीपुरवठा योजना आणि दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावोगावी जाऊन काम करावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

    October 1, 2026

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.