Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    नान्नज दरोड्याचा छडा; पाच जण ताब्यात

    October 8, 2026

    दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावोगावी जाऊन काम करावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

    October 1, 2026

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026
    Facebook X (Twitter)
    Thursday, October 8
    Facebook X (Twitter) Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»नान्नज दरोड्याचा छडा; पाच जण ताब्यात
    समृद्ध नगर विशेष

    नान्नज दरोड्याचा छडा; पाच जण ताब्यात

    Samrudha NagarBy Samrudha NagarOctober 8, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    नान्नज दरोड्याचा छडा; पाच जण ताब्यात

    स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सोन्याचे दागिने, मुद्देमाल जप्त — आठ घरफोड्यांचीही उकल

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : जामखेड तालुक्यातील जवळा येथे घरात घुसून चाकू व कोयत्याचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील विविध गावांमध्ये केलेल्या आठ घरफोडीच्या गुन्ह्यांचीही उकल झाली आहे.

    नान्नज, ता. जामखेड येथील फिर्यादी मनिषा श्रीमंत गोरे यांच्या घरात २ ऑक्टोबर रोजी रात्री दोनच्या सुमारास अनोळखी आरोपींनी प्रवेश केला. चाकू व कोयत्याचा धाक दाखवून गोरे व त्यांच्या कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने तसेच घरातील रोख रक्कम जबरीने चोरून नेली. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६७५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२) अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

    या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह पोलिस अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले.

    पथकाने गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. ७ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पिंपळगाव आवळा परिसरातून प्रदीप ऊर्फ गुड्या बिडकुत्या काळे (वय ३०), अनिल सुल्या पवार (वय ३४), सुविकास बिडकुत्या काळे (वय ४५), रुक्या ऊर्फ लोकेश बिडकुत्या काळे (वय ३५), सर्व रा. पिंपळगाव आवळा, तसेच समाधान ऊर्फ कारभारी दीपक काळे (वय २१, रा. वाकी) यांना ताब्यात घेण्यात आले.

    चौकशीत प्रदीप काळे याने या दरोड्यातील इतर साथीदारांची नावे सांगितली. लवचिक्या ऊर्फ लहु जालिंदर पवार, सोन्या नंग्या काळे आणि परबत ऊर्फ प्रभाकर ऊर्फ दीपक तुकाराम शिंदे हे तिघे फरार असून, सारिका चंदन काळे हिच्या नियोजनानुसार हा दरोडा टाकण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. चोरीचे सोन्याचे दागिने सारिका काळे व तिचा पती परबत शिंदे यांच्याकडे दिल्याचेही आरोपीने सांगितले.

    दरम्यान, समाधान काळे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथीदारांसह जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, आरणगाव, धामनगाव, वंजारवाडी, बुऱ्हाणपूर व चौंडी परिसरात रात्रीच्या वेळी घरफोड्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीचे सोन्याचे दागिने ओळखीचे बिभीषण सावंत व हनुमंत आबासाहेब वायकर, दोघेही रा. वाकी, यांच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याची माहितीही समोर आली.

    आठ गुन्ह्यांची उकल

    या तपासातून जामखेड व खर्डा पोलिस ठाण्यांतील घरफोडी व चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये जामखेड पोलिस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. २७९/२०२६, २८५/२०२६, ३२४/२०२६, ३२३/२०२६, ५१७/२०२६, ३९५/२०२६, ६४३/२०२६ तसेच खर्डा पोलिस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. १६१/२०२६ यांचा समावेश आहे.

    लाखो रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त

    चोरीचे दागिने ठेवून घेणाऱ्या व्यक्तींना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या. त्यांनी पंचांसमक्ष हजर केलेल्या मुद्देमालात सोन्याची अंगठी, मंगळसूत्र, बोरमाळ, मणीमंगळसूत्र, गंठण आदी दागिन्यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    रुक्या ऊर्फ लोकेश बिडकुत्या काळे याला जामखेड पोलिस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. ३२४/२०२६ मध्ये हजर करण्यात आले आहे. तसेच तो २०१५ मधील जामखेड पोलिस ठाण्यातील भादंवि कलम ३९४च्या गुन्ह्यातही पाहिजे आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

    ताब्यातील इतर आरोपींना जप्त मुद्देमालासह जामखेड पोलिस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. ६७५/२०२६ मध्ये पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलिस करीत आहेत.

    ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच पोलिस अंमलदार निळकंठ कारखेले, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, सुनिता पवार व अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावोगावी जाऊन काम करावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

    October 1, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    नान्नज दरोड्याचा छडा; पाच जण ताब्यात

    October 8, 2026

    दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावोगावी जाऊन काम करावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

    October 1, 2026

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.