Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026
    Facebook Twitter
    Thursday, April 30
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»प्रादेशिक बातम्या»आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव.
    प्रादेशिक बातम्या

    आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJuly 23, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि २३- आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या जिल्ह्यातील चार खेळाडूंना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या तसेच विविध जागतिक स्पर्धांसाठी निवड झालेल्या या खेळाडूंना जिल्हाधिकारी कार्यालयात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवला.

    क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंमध्ये धनश्री हनुमंत फंड हिने २० वर्षांखालील एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप, बर्लिन २०२४ मध्ये सुवर्णपदक पटकावले असून ती २० वर्षांखालील वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप, बल्गेरियासाठी निवडली गेली आहे. सुजय नागनाथ तनपुरे याने व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई बीच रेसलिंग कुस्ती स्पर्धेत ७० किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले असून ग्रीस येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

    शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या (२०१९-२०) श्रीमती प्रणिता सोमण हिने एप्रिल २०२५ मध्ये चीन येथे झालेल्या एम.टी.बी. एशियन चॅम्पियनशिप मिक्स टीम रिले स्पर्धेत कांस्यपदक पटकावले असून ती आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करत आहे. वेदांत नितीन वाघमारे याने पेरू येथे झालेल्या ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले असून तो कझाकिस्तान येथे होणाऱ्या एशियन शूटिंग चॅम्पियनशिपसाठी निवडला गेला आहे.

    जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेला उजाळा देणाऱ्या या खेळाडूंनी जागतिक स्तरावर आणखी यश संपादन करावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026

    गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 उपक्रमाचा शुभारंभ, त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

    April 14, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026

    जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई.

    April 19, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.