Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»शेती कट्टा»अतिवृष्टीग्रस्त कर्जत – जामखेडच्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड.
    शेती कट्टा

    अतिवृष्टीग्रस्त कर्जत – जामखेडच्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड.

    Samrudha NagarBy Samrudha NagarOctober 21, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    अतिवृष्टीग्रस्त कर्जत – जामखेड मधील शेतकऱ्यांची दिवाळी गोड

    १५८ कोटी ३१ लाख रुपयांचे भरीव अनुदान दिवाळीपूर्वीच थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात..

    महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची माहिती

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –

    माहे सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कर्जत-जामखेडसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली, बंधारे तुटले, घरांचे नुकसान झाले, आणि हजारो हेक्टर क्षेत्रातील उभे पीक पूर्णतः नष्ट झालेले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. शासनाने महसूल आणि कृषी विभागाला ही मदत दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

    या निर्णयाचा मोठा लाभ अहिल्यानगर जिल्ह्यासह कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांनाही मिळणार असून, कर्जत -जामखेडसाठी शासनाने एकूण १५८ कोटी ३१ लाख रुपयांचे भरीव अनुदान मंजूर झालेले आहे. अशी माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.

    कर्जत तालुक्यासाठी ९९ कोटी ४३ लाख रुपये आणि जामखेड तालुक्यासाठी ५८ कोटी ८८ लाख रुपये असा निधी निश्चित करण्यात आला आहे. या अंतर्गत कर्जत तालुक्यातील ११९ गावे, ९९,९६१ शेतकरी आणि ६५,५७८ हेक्टर क्षेत्र, तसेच जामखेड तालुक्यातील ७७ गावे, ५७,५६६ शेतकरी आणि ५६,३१४ हेक्टर क्षेत्र या अंतर्गत समाविष्ट आहेत.

    सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर महसूल आणि कृषी विभागांनी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासनास प्रस्ताव पाठविला होता. शासनाने तत्परतेने निर्णय घेऊन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

    या निर्णयामुळे कर्जत-जामखेडसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या आर्थिक अडचणींना हातभार लागणार आहे.

    महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी या निर्णयाचे केले स्वागत.

    “शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना शासनाने घेतलेला हा निर्णय त्यांच्या परिश्रमांचा सन्मान आहे. दिवाळीपूर्वी ही मदत खात्यात जमा होणे म्हणजे शासनाच्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. मी स्वतः अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या शासनापर्यंत पोहोचवलेल्या होत्या. त्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासनाने निधी मंजूर केला.” असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

    या अनुदानाच्या अनुषंगाने सभापती प्रा.राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. या निर्णयामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा मिळून शेती क्षेत्राला नवचैतन्य मिळेल, असा विश्वास स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी संघटना आणि कृषी संस्था यांनी व्यक्त केला असून त्याबद्दल त्यांनी सभापती प्रा.राम शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.