Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»निवडणूक»नगराध्यक्षा कोण होणार ? सभापती प्रा राम शिंदे , आ, रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला, शिवसेना शिंदे , राष्ट्रवादी {AP} पक्ष, अपक्ष प्रीती राळेभात यांचीही भूमिका महत्वाची.
    निवडणूक

    नगराध्यक्षा कोण होणार ? सभापती प्रा राम शिंदे , आ, रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला, शिवसेना शिंदे , राष्ट्रवादी {AP} पक्ष, अपक्ष प्रीती राळेभात यांचीही भूमिका महत्वाची.

    Samrudha NagarBy Samrudha NagarNovember 22, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    जामखेड नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 102 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

    सभापती प्रा राम शिंदे , आ रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला.

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि २ २ – नगराध्यक्षा कोण होणार ? सभापती प्रा राम शिंदे , आ, रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला, शिवसेना शिंदे , राष्ट्रवादी {AP} पक्ष, प्रीती राळेभात यांचीही राहणार महत्वाची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यामध्ये मुस्लीम उमेदवार यांची या निवडणुकीत महत्वाची भूमिका राहणार असल्याने जामखेड नगरपरिषद निवडणुकी चांगलीच रंगात आली आहे.

    जामखेड नगरपरिषद निवडणूकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 नगराध्यक्षांपैकी 4 उमेदवारांनी माघार घेतली. तर 120 अर्ज भरलेल्या नगरसेवकांपैकी 18 उमेदवारांनी माघार घेतली. आता नगराध्यक्षपदाचे 9 उमेदवार रिंगणात असल्याने नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे. सभापती प्रा राम शिंदे , आ रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 

                      यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्षपदाचे भाजप  , शिवसेना शिंदे गट ,  राष्ट्रवादी  काँग्रेस (शप) पक्ष , राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, समाजवादी पक्ष, अपक्ष यांच्यात खरी लढत रंगणार आहे. जामखेड नगरपरिषद निवडणुक जाहीर होताच इच्छुकांच्या गर्दी दिवसागणिक वाढत गेली होती त्यानुसार नगराध्यक्ष पदाच्या 1 जागेसाठी 9 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे वाढत्या थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे. 

    नगरसेवक पदासाठी जामखेड नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी 13 तर नगरसेवकपदासाठी 120 उमेदवारी अर्ज वैध झाले होते. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 4 नगराध्यक्षपदाच्या तर 18 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.  नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात  भाजपाच्या प्रांजलताई चिंतामणी,  संध्या राळेभात राष्ट्रवादी (शप) काँग्रेसच्या,   पायलताई  बाफना शिवसेना शिंदे पक्ष.,  सुवर्णा  निमोणकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेसच्या जैनब कुरैशी, समाजवादी पक्षाच्या परविन शेख, माजी प्रथम नगराध्यक्षा प्रिती  राळेभात (अपक्ष), नसीम बागवान (अपक्ष), रेश्मा शेख (अपक्ष), हे 9 उमेदवार जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी तर 24  नगरसेवक पदासाठी 102 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 

    दिनांक 21 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपद, नगरसेवक पदासाठी राहिलेल्या उमेदवारांचा प्रत्यक्षात प्रचार सुरू झाला आहे.   राहिलेल्या उमेदवारांपैकी कोणता उमेदवार कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे पाहणे अस्तुक्याचे ठरणार आहे.

    शहरांमध्ये सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा जोर वाढला आहे. जामखेड नगरपरिषदेच्या या सभागृहात निवडून येण्यासाठी सर्व उमेदवारांचा प्रयत्न सुरू झाला आहे.

    सभापती शिंदे व आ पवार नगराध्यक्ष पदाच्या  निवडणुकीत चांगलीच लागणार कस 

    सभापती प्रा राम शिंदे व आ रोहित पवार हे राज्याचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  या नगराध्यक्ष पदाच्या  निवडणुकीत चांगलीच कस लागणार आहे.त्यामुळे होऊ घातलेल्या नगरपरिषदच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

    चौकट 

    माजी नगराध्यक्ष प्रीती राळेभात नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात 

    माजी नगराध्यक्षा प्रीती राळेभात हे अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरले आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे दिसत आहे. 

     

    आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा

     आम आदमी पक्षाच्या उमेदवार रेहममुन्निसा  शेख यांची उमेदवारी देखील माघारी घेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणूक होऊ पर्यंत अजून किती उमेदवार पाठिंबा देणार हे पाहणे अस्तुक्याचे ठरणार आहे.

    चौकट 

    नगराध्यक्ष पदाचे माघारी घेतलेले उमेदवार

    आम आदमी पक्षाच्या उमेदवार रेहममुन्निसा शेख, वर्षा माने (अपक्ष), राळेभात प्रियंका (अपक्ष), शहेनाज शेख प्रहार जनशक्ती पक्ष, अशी माघार घेतलेले उमेदवार आहेत.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.