Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»प्रा. राम शिंदे : विधानपरिषद सभापतीपदाच्या कार्यकाळाची गौरवास्पद वर्षपूर्ती…
    ताज्या बातम्या

    प्रा. राम शिंदे : विधानपरिषद सभापतीपदाच्या कार्यकाळाची गौरवास्पद वर्षपूर्ती…

    Samrudha NagarBy Samrudha NagarDecember 17, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    प्रा. राम शिंदे : विधानपरिषद सभापतीपदाच्या कार्यकाळाची गौरवास्पद वर्षपूर्तीचा समृद्ध नगर न्यूज नेटवर्क घेतलेला आढावा.

     समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –

            *महाराष्ट्र विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा. राम शिंदे यांची सभागृहाने सभापतीपदी एकमताने  19 डिसेंबर, 2024 रोजी निवड केली. त्यास एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त त्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांबाबत आणि पीठासीन अधिकारी म्हणून दिलेल्या योगदानासंदर्भात हा एक दृष्टीक्षेप…

                प्राध्यापक असल्याने शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन, हे सभापती महोदयांचे गुणविशेष सभागृह कामकाजाचे संचालन करताना सर्व सन्माननीय सदस्यांना विशेषत्वाने जाणवतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यामुळेच त्यांचा ‘हेडमास्तर’ असा आदराने उल्लेख केला आहे. एकमताने सभापतीपदी निवड झाल्यानंतर सभागृहात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्वपक्षीय सन्माननीय सदस्यांनी आपल्या भाषणात त्यांचे अभिनंदन केले आणि काही अपेक्षाही व्यक्त केल्या. त्यावेळी सभापती महोदयांनी Q B B C ही विधानपरिषद कामकाजाच्या दृष्टीने महत्वाची अशी चतु:सूत्री जाहीर केली.

    1) Q – म्हणजे क्वेश्चन अवर अर्थात प्रश्नोत्तराच्या तासाचे महत्व लक्षात घेता जास्तीत जास्त प्रश्न पुकारले जातील, एका तासात जास्तीत जास्त प्रश्नांच्या माध्यमातून लोकहिताच्या दृष्टीने न्याय मिळेल याबाबतच्या कार्यवाहीला प्राधान्य देणे.

    2) B – म्हणजे Bill. विधेयक संमत होताना त्यावर विधानपरिषदेत परिपूर्ण चर्चा व्हावी. हे सभागृह ज्येष्ठांचे आहे, त्यामुळे विद्वतचर्चा, विचारमंथन याद्वारे कायदा निर्मितीची प्रक्रिया पूर्ण व्हावी.  कायदेमंडळाचे मुख्य कार्य कायदे करणे हे असल्याने No Bill should be passed without discussion ! 

    3) B – Budgetary Process… अर्थसंकल्पीय प्रक्रियेत महत्वाचा भाग असलेल्या सभागृहातील चर्चेप्रसंगी सन्माननीय सदस्यांचा सहभाग आणखी वाढावा यासाठी विशेष प्रयत्न करणे.

    4) C – C for Committee… संसदीय लोकशाहीचा समिती पध्दती हा आत्मा आहे, असे म्हटले जाते. विधिमंडळाच्या समित्या या Mini Legislature म्हणून काम करीत असतात, ही पध्दती आणखी प्रभावी करण्यावर भर देणे.

            सभापती महोदयांनी हाती घेतलेल्या या Q B B C चे विधायक दृश्य परिणाम अधिवेशानांत दिसून येत आहेत. सभागृह सुरु होण्याअगोदर सर्वपक्षीय गटनेत्यांची नियमित बैठक घेणे हा शिरस्ता ते राबवित असल्याने सभागृह कामकाजात अधिक समन्वय आणि सौहार्दपूर्ण वातावरण दिसत आहे.

            पेपरलेस डेमोक्रसी, वन नेशन वन प्लॅटफॉर्म, कायदा निर्मितीप्रक्रियेत जनतेचा अधिकाधिक सहभाग, लोकनियुक्त प्रतिनिधींची सभागृहे जनतेप्रति अधिकाधिक उत्तरदायी होणे, याबाबतची लोकसभा अध्यक्ष माननीय श्री. ओम बिर्ला यांची संकल्पना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधिमंडळाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रकियेद्वारे पुढे नेत आहेत.  पटणा येथे झालेल्या 85 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी – “भारतीय राज्यघटनेची 75 वर्षे : घटनात्मक मुल्यांच्या बळकटीसाठी संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे योगदान” या विषयावर झालेल्या विचारमंथनात सहभाग घेतला. जागतिक स्तरावर भारताने एक  शक्तीशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे. आपल्या राज्यघटनेने त्या दृष्टीने भक्कम आधारशिला तयार करुन दिली असल्यानेच हे शक्य झाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीचा प्रारंभ तेव्हाच्या बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिल सदस्यत्वापासून झाला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे त्यांनी या परिषदेमध्ये बोलतांना नमूद केले.

     विधानपरिषद शतक महोत्सवा निमित्त सभापती महोदयांच्या मार्गदर्शनाखाली  द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात

    विधानपरिषद सभागृहात समारंभपूर्वक करण्यात आले.

           फेब्रुवारी, 2025 मध्ये सभापती महोदय आणि अध्यक्ष महोदय यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र विधिमंडळातील दोन्ही सभागृहांच्या नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांसाठी “प्राईड” संस्था, संसद भवन, नवी दिल्ली येथे संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवसीय अभ्यासवर्गातील मार्गदर्शनाचा सन्माननीय सदस्यांना खूप लाभ झाला.

            पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च, 2025 मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अभिवादन प्रस्ताव घेण्यात यावा, अशी सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी मांडली आणि त्यानुसार दोन्ही सभागृहांनी या प्रस्तावाच्या अनुषंगाने या थोर, कर्तबगार, लोककल्याणकारी महिला राज्यकर्तीच्या प्रेरणादायी स्मृतीस मानवंदना अर्पित केली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासातील हा आणखी एक गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

             सभापती महोदयांच्याच पुढाकाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे जन्म ठिकाण चोंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे 06 मे, 2025 रोजी राज्य मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. अशा प्रकारे राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ कॅबिनेटच्या निमित्ताने छोट्या गावात येण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. जागतिक स्तरावर चोंडी हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून लवकरच नावारूपाला आलेले आपल्याला बघायला मिळेल.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.