Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»शिक्षिका शोभा डांगे यांना अखेर न्याय, शिवसेना तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश.
    ताज्या बातम्या

    शिक्षिका शोभा डांगे यांना अखेर न्याय, शिवसेना तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश.

    Samrudha NagarBy Samrudha NagarDecember 29, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि.29

    शिक्षिका शोभा डांगे यांना अखेर न्यायशिवसेना तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश.

    बीड | प्रतिनिधी – बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील एका प्रलंबित व अन्यायकारक प्रकरणाला अखेर न्याय मिळाला असून शिक्षिका शोभा शिवाजीराव डांगे यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. शिवसेना तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व ठोस भूमिकेमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

    या संदर्भात बीड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण कुवर यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहसचिव एकनाथ शेलार यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे संबंधित शिक्षक प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला.शिक्षिका शोभा डांगे यांच्यावर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय देण्यात आल्याने शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    सदर प्रकरणात संबंधित विभागाकडून विलंब व दुर्लक्ष होत असल्याने शिक्षिकेला मानसिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र शिवसेनेच्या माध्यमातून हा प्रश्न थेट वरिष्ठ स्तरावर मांडण्यात आला.नितीन कोल्हे यांनी प्रशासनासमोर वस्तुनिष्ठ माहिती व कागदपत्रांसह ठाम भूमिका मांडत शिक्षकांवर अन्याय होणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी स्पष्ट मागणी केली. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून संबंधित आदेश काढण्यात आले आहेत.

    या निर्णयामुळे केवळ शोभा डांगे यांनाच नव्हे तर भविष्यात अशा प्रकारच्या अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. शिक्षक हितासाठी शिवसेना नेहमीच रस्त्यावर व कार्यालयात लढत राहील, असे मत यावेळी नितीन कोल्हे यांनी व्यक्त करण्यात आले.

    शिक्षिका शोभा डांगे यांनी न्याय मिळाल्याबद्दल शिवसेना नेतृत्व, नितीन कोल्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहसचिव एकनाथ शेलार यांचे आभार मानले आहेत.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव हुलगुंडे यांचा समाजोपयोगी उपक्रम.

    January 11, 2026

    बाल वैज्ञानिक प्रदर्शन विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, संशोधन वृत्तीला दिशा देणारे व्यासपीठ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील.

    January 9, 2026

    सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा जि. प. शाळेत शालेय साहित्य वाटप.

    January 2, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.