Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 उपक्रमाचा शुभारंभ, त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

    April 14, 2026

    जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

    April 12, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026
    Facebook X (Twitter)
    Saturday, April 18
    Facebook X (Twitter) Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 उपक्रमाचा शुभारंभ, त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
    समृद्ध नगर विशेष

    गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 उपक्रमाचा शुभारंभ, त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

    Samrudha NagarBy Samrudha NagarApril 14, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त आयोजन*मुंबई, दि. 13 : “गोदा ते नर्मदा” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 25 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

    गोदा ते नर्मदा या जलयात्रेबाबत मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा , जलसंपदा लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींची जन्मभूमी चोंडी महाराष्ट्रात असून त्यांचा प्रभावी सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राशी जोडलेला आहे. अहिल्यादेवींच्या कार्यातील सुशासन, महिला नेतृत्व, लोककल्याण, जलदृष्टी , वारसा संवर्धन यासाठी राष्ट्रीय मूल्ये महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासनाकडून त्याचे स्मरण करताना हा उपक्रम या जलयात्रेच्या निमित्ताने राबविला जाणार आहे.25 एप्रिल 2026 रोजी अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून यात्रांचा शुभारंभ होईल आणि या यात्रांचा संगम शिर्डी येथे होणार असून तेथून छत्रपती संभाजी नगर घृष्णेश्वर, धुळे या मार्गाने इंदूर येथे 29 एप्रिल रोजी समारोप होईल.

    या जलयात्रेदरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रम जलयात्रेच्या मार्गावरील गावांमध्ये आणि शहरात होणार आहेत.*पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलदृष्टीचा गौरव*लघु कालव्यांचे जाळे उभारणे, पाणी साठवण आणि जलसंवर्धन, शेतीपूरक विकास, स्थानिक रोजगार आणि कुटीर उद्योगांना चालना हे अहिल्यादेवींचे जलसंवर्धनातील कार्य प्रेरणास्त्रोत आहे.

    अहिल्यादेवींनी हे तत्त्व 250-300 वर्षांपूर्वी आचरणात आणले होते. अहिल्यादेवींनी गरीब, वंचित, शेतकरी आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून शासन केले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला असून या कालावधीत विविध उपक्रम देशभरात आयोजित करण्यात आले आहेत.▶ स्मारक नाणे व टपाल तिकीट प्रकाशन▶ महिला सक्षमीकरण, सुशासन व वारसा संवर्धनाशी निगडित उपक्रम▶ प्रदर्शने, प्रकाशने, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम.▶ विविध राज्ये, संस्था यांच्यावतीने विविध कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर आयोजन केले गेले आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    डॉ. हृतिक घोलप एम.डी. (बालरोग) साठी नागपूरमध्ये प्रवेश

    February 20, 2026

    अवैध सावकारांवर धडक कारवाई करा; तक्रारी तातडीने निकाली काढा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    February 18, 2026

    समाजकल्याण वसतीगृहातील माजी विद्यार्थ्याची तालुका कृषी अधिकारी पदावर निवड

    February 12, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 उपक्रमाचा शुभारंभ, त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

    April 14, 2026

    जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

    April 12, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.