Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
    समृद्ध नगर विशेष

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    Samrudha NagarBy Samrudha NagarApril 24, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    कर्जत तालुक्यात प्रगणक प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि .२४ :- जनगणना ही देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून प्रत्येक प्रगणकाने आपली जबाबदारी अचूक व प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.

    राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात प्रगणकांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली तेव्हा ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, नागरिकांशी संवाद साधताना नम्रता, विश्वासार्हता राखावी. प्रत्येक घरातील माहिती अचूकपणे नोंदवावी. जनगणना प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे आवश्यक आहे. समन्वय, सातत्य, शिस्त यांना प्राधान्य देऊन काम वेळेत पूर्ण करावे.

    कर्जत तालुक्यात घरांची, कुटुंबांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी सुमारे ६९ पर्यवेक्षक, ३५८ प्रगणकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जात आहे. दि. २३ एप्रिल २०२६ ते ०८ मे २०२६ या कालावधीत चार टप्प्यांत प्रशिक्षण आयोजित केले आहे. प्रत्येक टप्प्यात तीन दिवस सखोल मार्गदर्शन दिले जात आहे.

    प्रशिक्षणात तांत्रिक बाबी, अर्ज भरण्याची पद्धत, माहिती संकलनातील अचूकता याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. यावेळी संबंधित अधिकारी, प्रशिक्षणार्थी प्रगणक उपस्थित होते.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.