Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026
    Facebook Twitter
    Thursday, July 30
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»क्रीडा»सांघिक भावनेतून प्रशासनात सक्षम व कार्यक्षम टीम तयार व्हावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
    क्रीडा

    सांघिक भावनेतून प्रशासनात सक्षम व कार्यक्षम टीम तयार व्हावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

    Samrudha NagarBy Samrudha NagarFebruary 13, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    सांघिक भावनेतून प्रशासनात सक्षम व कार्यक्षम टीम तयार व्हावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

                अहिल्यानगर दि. १३- खेळाच्या माध्यमातून सांघिक भावना वाढीस लागून प्रशासनात एक सक्षम व कार्यक्षम टीम निर्माण व्हावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली.

        महसुल विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गुण गौरव कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते.

                यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, श्रीकांत चिंचकर, सायली सोळंके, गौरी सावंत, शाहूराज मोरे, अरुण उंडे आदी उपस्थित होते.

                स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत जिल्हाधिकारी श्री.सालीमठ म्हणाले, धुळे येथे नुकत्याच झालेल्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकवत चांगली कामगिरी केली. पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग कमी आहे. महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धांमध्ये अधिक प्रमाणात सहभाग घेण्याची गरज आहे. पुढील वर्षी क्रीडा स्पर्धा आयोजनाची संधी आपल्या जिल्ह्याला मिळाली असून या स्पर्धांमध्ये जिल्ह्याने चांगली कामगिरी करावी यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. समितीने उत्कृष्ट खेळाडूंची निवड करत त्यांना प्रोत्साहन द्यावे. खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा, साहित्याची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी यावेळी दिली.

                अपर जिल्हाधिकारी श्री.कोळेकर म्हणाले, धुळे येथील स्पर्धेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असली तरी आपला जिल्हा अग्रेसर राहावा यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

         यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव हुलगुंडे यांचा समाजोपयोगी उपक्रम.

    January 11, 2026

    बाल वैज्ञानिक प्रदर्शन विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, संशोधन वृत्तीला दिशा देणारे व्यासपीठ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील.

    January 9, 2026

    शिक्षिका शोभा डांगे यांना अखेर न्याय, शिवसेना तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश.

    December 29, 2025

    Comments are closed.

    Our Picks

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026

    मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; दरोड्यासह १० गुन्ह्यांची उकल

    July 15, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.