Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जिल्हा नियोजन समितीवर अजय काशीद, संध्या सोनवणे यांची वर्णी.

    July 7, 2026

    मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी घरोघरी भेटी सुरू; नागरिकांनी सहकार्य करावे- सुधीर पाटील

    June 30, 2026

    पुण्यातील घायवळ टोळीचे दोन फरार आरोपी जेरबंद; 

    June 22, 2026
    Facebook Twitter
    Tuesday, July 7
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»जिल्हा नियोजन समितीवर अजय काशीद, संध्या सोनवणे यांची वर्णी.
    समृद्ध नगर विशेष

    जिल्हा नियोजन समितीवर अजय काशीद, संध्या सोनवणे यांची वर्णी.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJuly 7, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    जिल्हा नियोजन समितीवर अजय काशीद, संध्या सोनवणे यांची वर्णी

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समितीवरील सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांची घोषणा केली असून, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सारोळ्याचे माजी सरपंच अजय काशीद यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने ६ जुलै रोजी याबाबतचा आदेश जारी केला.

    अजय काशीद यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे चिटणीस, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तसेच सलग 6 वर्ष तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे. सारोळा गावचे दहा वर्षे बिनविरोध सरपंच म्हणून काम पाहिले. त्यांनी रस्ते, भूमिगत गटारे, जलसंधारण व विविध विकासकामे राबविली. जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली होती.

    तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात गावातील शाळेने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून, कै. विष्णुवस्ताद (बाबा) काशिद यांच्या स्मरणार्थ व नागेश्वर यात्रेनिमित्त दरवर्षी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असतो.

    संध्याताई सोनवणे या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर कार्यरत आहेत. महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, सामाजिक प्रश्न आणि लोकहिताच्या विषयांवर त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची व विकासविषयक अनुभवाची दखल घेत त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    दोन्ही नियुक्त्यांचे राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतून स्वागत करण्यात आले असून, कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला या दोन्ही नियुक्त्यांमुळे अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी घरोघरी भेटी सुरू; नागरिकांनी सहकार्य करावे- सुधीर पाटील

    June 30, 2026

    नव्या सक्षम सहकार धोरणामुळे राज्याची अर्थव्यवस्था बळकट होणार : विवेक जुगादे

    June 19, 2026

    तुकाई उपसा जलसिंचन योजनेचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा; भैरवनाथ योजनेचा प्रस्ताव ऑगस्टअखेर सादर करा : सभापती प्रा. राम शिंदे

    June 17, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जिल्हा नियोजन समितीवर अजय काशीद, संध्या सोनवणे यांची वर्णी.

    July 7, 2026

    मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी घरोघरी भेटी सुरू; नागरिकांनी सहकार्य करावे- सुधीर पाटील

    June 30, 2026

    पुण्यातील घायवळ टोळीचे दोन फरार आरोपी जेरबंद; 

    June 22, 2026

    नव्या सक्षम सहकार धोरणामुळे राज्याची अर्थव्यवस्था बळकट होणार : विवेक जुगादे

    June 19, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.