Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Samrudha Nagar
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.
जामखेड शहराचा जुना प्रारुप विकास आराखडा रद्द करा आणि नवा आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आदेश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – जामखेड शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जामखेडच्या जुन्या प्रारुप विकास आराखड्यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारुप विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी आज विधानभवनात झालेल्या बैठकी दरम्यान दिले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वाची बैठक झाली.…
विभागीय साईज्योती सरस २०२५ प्रदर्शनाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जिल्हास्तरावर ‘उमेद मॉल’ उभारणार– पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि .१६- जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील तांबटकर मळा येथे आयोजित विभागीय साईज्योती सरस २०२५ महिला बचतगट निर्मित खाद्यपदार्थ व वस्तुंच्या विक्री प्रदर्शनाचे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असलेल्या अद्ययावत उमेद मॉलची जिल्हास्तरावर उभारणी करण्यात येईल, तसेच…
नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि.७ – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत…
इंदापूर समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : पुणे, अहिल्यानागरसह सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा जलसाठा निम्म्यावर आला आहे. जसजशा उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत, तशी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढू लागली आहे. उपसा सिंचन, उन्हाळी आवर्तन व पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याच्या व भीमानदीपात्रातून भरमसाठ पाणी सोडण्यात येत आहे .परिणामी, उजनी धरण्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. त्यामुळे उजनी जलाशयातील पाण्याचे तातडीने व काटेकोरपणे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. दरम्यान, दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधी टाहो फोडतात, परंतु यश येत नाही. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार असलेली कालवा सल्लागार समिती नेमके करते काय? याप्रश्नी शेतकरीवर्ग सध्या आक्रमक आहे. यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस…
दुध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून अगस्ति ऋषी मंदिर सभामंडप आणि संरक्षक भिंत कामांचे भूमिपूजन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. २६ – दूध भेसळीविरोधात शासनाने कठोर पावले उचलली असून मुंबईतील चार नाके सील करण्यात आले आहेत. एकूण ९८ टँकर तपासण्यात आले, त्यापैकी काही परत पाठवण्यात आले. पनीर व खव्यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले., शासनाकडून दूध भेसळ रोखण्यासाठी तसेच तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. सामाजिक दायित्व निधीतून अगस्ति ऋषी मंदिरासाठी पाच लाख…
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी… ” गीताला पहिला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरातून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. २५ : कवी मनाचे महान योध्दे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून दिला जाणार पहिला “राज्य प्रेरणा गीत पुरस्कार” स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी.. ” या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन केली. ज्या पध्दतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला…
मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी * राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात * स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – फडणवीस * संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर नवी दिल्ली दि.21 : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून…
गोरगरिबांना हक्काचे घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना मिशन मोडवर राबवा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर दि.२२- समाजातील प्रत्येक गोरगरीबाला हक्काचे व परवडणारे घर देण्याचे काम प्रधानमंत्री आवास योजनेतून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवून हक्काचे घर मिळविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना मिशन मोडवर राबविण्याची सूचना राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. शहरातील सहकार सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हफ्ता वितरणाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री.विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा…
कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे. दिल्लीतील 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कवी कट्ट्याचे उद्घाटन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दिल्ली दि.22 : दिल्ली येथे सुरू असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (23 फेब्रुवारी 2025) महात्मा ज्योतिराव फुले सभामंडपात “कवी कट्ट्याचे” उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी कवी कट्ट्याचा वर्षांचा प्रवास उलगडून दाखवला आणि मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे समन्वयक राजन लाखे व गोपाळ कांबळे यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली. प्रारंभी राजन…
समाजाच्या सर्व घटकाला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याची शासनाची भूमिका – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि.२२ – समाजाच्या सर्व घटकाला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याची शासनाची भूमिका असल्याचे मत राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. राहूरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या उर्वरित कामांचे व विशेष दुरुस्ती कामाचा भूमिपूजन व कोल्हार खूर्द येथील ग्राम सचिवालय नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, जलसंपदा विभागाचे…