Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Samrudha Nagar
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.
राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला डॉ. सी. डी. मायी कृषीतज्ज्ञ पुरस्कार प्रदान समृद्ध नगर न्यूज नेटवर्क नागपूर, ता. १८ – कृषी क्षेत्रात लागवड, बियाणे, सिंचन, खत व्यवस्थापन या सर्वच बाबतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राजेंद्र पवार यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपली कटिबद्धता सिद्ध केली, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बारामतीच्या ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे चेअरमन राजेंद्र पवार यांचा गौरव केला. ज्येष्ठ कृषि शास्त्रज्ञ, मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु, ICAR चे माजी संचालक डॉ. सी. डी. मायी यांच्या सन्मानार्थ कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस…
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : स्थानिक गुन्हे शाखेने मोक्का गुन्ह्यासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गाजलेल्या दरोड्यासह एकूण १० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. १६ मे २०२६ रोजी अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे पहाटे चार अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. तसेच कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटून पोबारा केला होता. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे वाळकी परिसरात सापळा रचून…
अजितदादांच्या जयंतीला सरकार मोठा निर्णय घेणार?; रोहित पवारांची तीन महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत मागणी’चार दिवसांचे कार्यक्रम नकोत; कायमस्वरूपी स्मरण राहील असा निर्णय घ्या’, सरकारसमोर रोहित पवारांची अपेक्षासमृद्ध नगर न्यूज नेटवर्क मुंबई : २२ जुलै रोजी अजितदादांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकार मोठी घोषणा करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. अजितदादांच्या न्यायासाठीचा लढा सुरूच राहील, असे स्पष्ट करत रोहित पवार म्हणाले की, सरकारने केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण राहील असा निर्णय घ्यावा. पुणे रिंग रोड, तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड मार्ग आणि पुणे-शिरूर एलिव्हेटेड…
शेतकरी कर्जमाफी योजनेतील दोन्ही जाचक अटी हटवल्या, आमदार रोहित पवार यांच्या आदोलनाचे मोठे यश राज्यातील सुमारे ३६ लाख तर कर्जत-जामखेडमधील ६० हजार शेतकऱ्यांना होणार लाभ समृद्ध नगर न्यूज नेटवर्क ता. १० – २०१९ मध्ये ‘महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजने’चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीतून वगळण्याची अट आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी २०२६-२७ सालचं कर्ज नियमित भरण्याची या दोन्ही जाचक अटी काढून टाकल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत केली. या जाचक अटी काढून विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर रान उठणवारे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचे मोठे यश असून याचा राज्यातील सुमारे ३६…
जिल्हा नियोजन समितीवर अजय काशीद, संध्या सोनवणे यांची वर्णी समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समितीवरील सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांची घोषणा केली असून, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सारोळ्याचे माजी सरपंच अजय काशीद यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने ६ जुलै रोजी याबाबतचा आदेश जारी केला. अजय काशीद यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे चिटणीस, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तसेच सलग 6 वर्ष तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे. सारोळा गावचे दहा वर्षे बिनविरोध सरपंच म्हणून काम पाहिले. त्यांनी रस्ते, भूमिगत…
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी घरोघरी भेटी सुरू; नागरिकांनी सहकार्य करावे- उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील समृद्ध नगर न्यूज नेटवर्क अहिल्यानगर, दि. ३०-भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र वितरित करून ते भरून घेणार आहेत. नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी नायब तहसीलदार सुधीर उबाळे, नायब तहसीलदार कैलास साळुंखे आदी उपस्थित होते. श्री.पाटील म्हणाले की, २२५ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख १५ हजार…
पुण्यातील घायवळ टोळीचे दोन फरार आरोपी जेरबंद; जामखेड मधील गुन्ह्यातील एक आरोपी अटक , अहिल्यानगर एलसीबीची धडक कारवाई समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित आणि मोक्का कायद्यांतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोन आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर (वय २७, रा. खर्डा, ता. जामखेड) याला कोल्हापूर जिल्ह्यातून, तर ज्ञानेश्वर उर्फ माऊली दगडू तोंडे (वय ४०, रा. खेचरे, ता. मुळशी, जि. पुणे) याला अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. खर्डा येथील विजयसिंह कल्याणराव गोलेकर (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रोहित गोलेकर याने व्हॉट्सअॅप कॉलद्वारे २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी…
नव्या सक्षम सहकार धोरणामुळे राज्याची अर्थव्यवस्था बळकट होणार : विवेक जुगादे समृद्ध नगर न्यूज नेटवर्क अहिल्यानगर – राज्यात नव्याने तयार होत असलेल्या सहकार धोरणामुळे सहकारी संस्थांचे कामकाज अधिक सुलभ होऊन राज्याची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केले. सहकार भारतीच्या अहिल्यानगर दक्षिण विभागाच्या वतीने आयोजित ‘सहकार संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे व विवेक जुगादे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रवी बोरावके, प्रदेश सहसंघटन प्रमुख प्रवीण बुलाख, विभागप्रमुख संतोष गायकवाड, जिल्हा पतसंस्था…
तुकाई उपसा जलसिंचन योजनेचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा; भैरवनाथ योजनेचा प्रस्ताव ऑगस्टअखेर सादर करा : सभापती प्रा. राम शिंदे दोन्ही योजनांच्या प्रगतीचा उच्चस्तरीय आढावा; कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा समृद्ध नगर न्यूज नेटवर्क | मुंबई | दि. १७ जून २०२६ अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करण्यात यावीत, तसेच मिरजगाव येथील भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव ऑगस्टअखेरपर्यंत शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही…
बनावट UTRच्या आधारे 41 लाखांची फसवणूक; पाच स्विफ्ट डिझायरसह दोघे जेरबंदमारुती सुझुकी शोरूमला गंडा; कोतवाली पोलिसांनी पाचही वाहने जप्त केली समृद्ध नगर न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : बनावट बँक मेसेज, खोटे UTR क्रमांक आणि न वटणारे धनादेश देऊन तब्बल 41 लाख रुपयांच्या पाच नवीन स्विफ्ट डिझायर टी-परमिट कारांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच फसवणुकीत मिळविलेल्या सर्व पाच गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पवन गुरुनाथ पांडव (वय 38) आणि संतोष त्रिंबक दळवी (वय 44, दोघेही रा. निर्मलनगर, सावेडी, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 3 जानेवारी 2026 रोजी शिल्पा गार्डनसमोरील महालक्ष्मी ऑटोमोटीव्ह…