Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Samrudha Nagar
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.
करमाळा–जामखेड राज्य महामार्ग 56 च्या 40 किमी सिमेंट काँक्रीट रस्ता कामाला गती; ₹300 कोटींच्या निधीतून विकास समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र अमृत काल रस्ते विकास योजना (टप्पा 1) अंतर्गत करमाळा–जामखेड राज्य महामार्ग क्र. 56 या महत्त्वाच्या मार्गाच्या 40 किलोमीटर सिमेंट काँक्रीट रस्ता सुधारणा कामाला गती मिळाली असून, या कामासाठी अंदाजे ₹300 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. करमाळा, जामखेडसह सोलापूर, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या रस्त्याच्या विकासामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकल्पांतर्गत 10 मीटर रुंदीचा दर्जेदार सिमेंट काँक्रीट रस्ता उभारण्यात येणार आहे.…
जामखेड तालुक्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई; सहकार विभागाच्या एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी! समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची धडक कारवाई; तीन ठिकाणी छापे, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. जामखेड तालुक्यात अवैध सावकारीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागाने पोलिस प्रशासनाच्या मदतीने मोठी धडक कारवाई केली. तालुक्यात एकाच वेळी 3 ठिकाणी छापे टाकत अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत कोरे धनादेश, खरेदीखते तसेच इतर आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यात अवैध सावकारी सुरू असल्याबाबत प्रशासनाकडे आवश्यक कागदपत्र सह तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे…
चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि. २७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श कायम स्मरणात राहणार आहे. त्यांच्या जीवनकार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चौंडी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. चोंडीचा विकास सर्वसमावेशक व नियोजनबद्ध पद्धतीने करत दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनास चालना देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ, चोंडी येथील जतन, संवर्धन व विकास आराखड्यासंदर्भात बैठक वर्षा निवासस्थान येथे झाली. या बैठकीस विधानपरिषदेचे…
जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : २७आ. रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जामखेड पंचायत समितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कृषी, महावितरण, महसूल आणि पंचायत समितीशी संबंधित विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीत त्यांनी संबंधित विभागांशी निगडित नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेतल्या आणि त्या जागीच सोडविण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या.दरम्यान, अनेक कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. काही ठिकाणी कामातील त्रुटी आणि निष्काळजीपणावरून संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. “नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळालाच पाहिजे आणि प्रलंबित कामे लवकर पूर्ण झाली…
जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया कर्जत तालुक्यात प्रगणक प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि .२४ :- जनगणना ही देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून प्रत्येक प्रगणकाने आपली जबाबदारी अचूक व प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात प्रगणकांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली तेव्हा ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, नागरिकांशी संवाद साधताना नम्रता, विश्वासार्हता राखावी. प्रत्येक घरातील माहिती अचूकपणे नोंदवावी. जनगणना प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी…
जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई वर्षभरात १५५ प्रकरणांमध्ये हस्तक्षेप, ७ गुन्हे दाखल समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि.१९ एप्रिल : बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत व्यापक कारवाई करत १५५ प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केला असून, त्यापैकी ७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास तो विवाह कायद्याने दंडनीय ठरतो. अशा बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरांवर कारवाई करण्यात येत असून, काही प्रकरणांमध्ये विवाह थांबवून पालकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे, तर आवश्यकतेनुसार…
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त आयोजन*मुंबई, दि. 13 : “गोदा ते नर्मदा” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 25 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. गोदा ते नर्मदा या जलयात्रेबाबत मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती…
जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – तालुक्यातील बावी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत Abhijit Bhaskar Nikam (वय २९, रा. बावी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी रात्री कुटुंबीय जेवण करून झोपले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास घरातील सदस्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी कपाट तसेच किचनमधील धान्याच्या डब्यांची उचकापाचक केली. यामध्ये तांदळाच्या डब्यात ठेवलेले सुमारे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (गंठण, बोरमाळ, झुबे) अंदाजे ६२,५०० रुपये किमतीचे तसेच १०,००० रुपये रोख रक्कम (५००…
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : रबी हंगाम 2025-26 साठी हरभरा खरेदी प्रक्रियेला वेग देण्यासाठी शासनाने ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी करावयाची ऑनलाईन नोंदणी आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत ३१ मार्चपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, सध्याचे बाजारभाव, शेतकऱ्यांची स्थिती तसेच नाफेडच्या विनंतीचा विचार करून शासनाने ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे उशिरा काढणी झालेल्या किंवा अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाने हरभऱ्यासाठी ५,८५० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला असून, या दराने खरेदी केली जाणार आहे. बाजारातील दरात होणाऱ्या चढ-उतारांपासून संरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना किमान…
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट आ रोहित पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती. बारामती समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर होत असलेली बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भावना बारामतीकरांसह संपूर्ण राज्यभरातील जनतेत व्यक्त होत आहे. दादांना खरी श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जनभावनेचा आदर करत आपला उमेदवार माघारी घेतला आहे. या निर्णयाबद्दल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला यांच्यासह राज्यातील सर्व काँग्रेस नेते आणि उमेदवार आकाश मोरे यांचे आ रोहित पवार यांनी आभार मानण्यात आले आहेत. या प्रक्रियेत…