Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Samrudha Nagar
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी बेताल वक्तव्य करून आमच्या धार्मिक श्रद्धा व भावना भडकवल्या म्हणून त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने जामखेड पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक सोनवलकर याना निवेदन देण्यात आले.यावेळी धारकरी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी भावना दुखावणारे व कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करणारे वक्तव्य केले की, संभाजी भिडे स्वतःला गुरुजी समजतो त्याने…
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – अभिजात मराठीचा गौरव सोहळा! अभिजाततेचा गौरव मिरवणाऱ्या मराठी भाषेचा आणि तिच्या समृद्ध साहित्यपरंपरेचा भव्य उत्सव म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांचे हृदयस्पंदन आहे. यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत होत आहे, हे संमेलन मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. मराठी भाषा – परंपरा आणि आधुनिकतेचा संगम मराठी भाषेचा प्रवास हा केवळ काही शतकांचा नाही, तर तो संस्कृती, इतिहास, साहित्य, विचारधारा आणि चळवळी यांचा जाज्वल्य इतिहास आहे. शिवकालीन युद्धनीती असो, संतवाङ्मयातील अध्यात्म असो, की लोकमान्य…
शेतरस्ता वादाचा सामंजस्याने निकाल सांगवी भुसार व मायगाव देवी येथे तहसीलदारांच्या प्रयत्नांना यश समृद्ध नगर न्यूज नेटवर्क शिर्डी, दि. १५ – कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार व मायगाव देवी येथे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शेतरस्ता वादाचा तहसीलदार महेश सावंत यांच्या मध्यस्थीने सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. वादी-प्रतिवादींनी एकत्र येत वादावर तोडगा काढल्याने समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. सांगवी भुसार येथे दोनदा न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरही वाद मिटला नव्हता. न्यायालयीन लढाई, वेळ आणि खर्चामुळे दोन्ही बाजूंना त्रास होत होता. अखेर महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन दोन्ही पक्षांना एकत्र बसवले आणि संवादातून सामंजस्य घडवून आणले. दोघांनीही मोठेपणा दाखवत शेतरस्ता खुला करण्यास सहमती दर्शवली. उपस्थित पंचमंडळींनी…
शासकीय पदातून समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय देण्याचे कार्य व्हावे- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि १५ शासकीय सेवेत कायदे व नियमांचे पालन करताना माणुसकीची भावना जपली जावी आणि समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूरच्या विदर्भ विकास मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अर्जुन किसनराव चिखले आणि मंत्रालयातील नियोजन विभागात सह सचिव म्हणून कार्यरत विवेक बन्सी गायकवाड यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल तसेच बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचा जिल्हा सत्कार समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. सालीमठ बोलत होते.…
बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल अहिल्यानगर, दि.१५ – जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आनंद गंगाराम देवरे यांनी त्यांच्या मुलाच्या जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. यासाठी त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे जातवैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केले. मात्र, समितीने पडताळणी केली असता, संबंधित वैधता प्रमाणपत्र हे खोटे व बनावट असल्याचे आढळून आले. याबाबत अधिक तपास करताना समितीच्या दक्षता पथकाने अर्जदाराच्या भावाचे जातवैधता प्रमाणपत्र आधीच अपूर्ण कागदपत्रांमुळे नस्तीबंद झाल्याचे निष्पन्न केले. तरीही अर्जदाराच्या वडिलांनी ते प्रमाणपत्र सादर करून समितीची…
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व उत्सव अभिजात मराठीचा निमित्त विशेष लेख ।। एथ ज्ञान हें उत्तम होये ।। (भाग-२) समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि १५ ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या मध्यमातून धर्म आणि तत्त्वज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहचविले. भक्तिमार्गाला शुद्ध केले. अनासक्तीचा गृहस्थाश्रम हा परमार्थाचा श्रेष्ठ मार्ग दाखविला. भक्तीचा सिद्धान्त प्रस्थापित केला. अशा या थोर ग्रंथाचे हिंदी, संस्कृत, बंगाली, ओरिसा, कन्नड, तेलुगू, तमिळ, इंग्लिश, फ्रेंच, रशियन, चिनी भाषेत अनुवाद झालेले आहेत. या सर्व प्रवासामध्ये अनेकांनी ‘ज्ञानेश्वरी’ चे परिशीलन केले. त्यामध्ये भाविक, अभ्यासक अशी अनेक माणसे आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांचे कालखंडाच्या दृष्टीने मुद्रणपूर्व आणि मुद्रणोत्तर असे दोन स्वतंत्र भाग मानता येतात. ‘ज्ञानेश्वरी’ची…
कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ वॉररूमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडून हजार परीक्षा केंद्रांची पाहणी समृध्द नगर न्यूज नेटवर्क अहिल्यानगर दि. १३- जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत, सुरळीत व कॉपीमुक्त कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतील ‘आनंददायी परीक्षा पॅटर्न’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. या वॉररुमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सुमारे एक हजारपेक्षा अधिक केंद्रांची पाहणी करत पर्यवेक्षणाबाबत विविध सूचना केल्या. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याबरोबरच परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. संवेदनशील केंद्रांसह सर्वच केंद्रांच्या विविध ब्लॉक मधील थेट दृश्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा…
सांघिक भावनेतून प्रशासनात सक्षम व कार्यक्षम टीम तयार व्हावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ अहिल्यानगर दि. १३- खेळाच्या माध्यमातून सांघिक भावना वाढीस लागून प्रशासनात एक सक्षम व कार्यक्षम टीम निर्माण व्हावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली. महसुल विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गुण गौरव कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, श्रीकांत चिंचकर, सायली सोळंके, गौरी सावंत, शाहूराज मोरे, अरुण उंडे आदी उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत जिल्हाधिकारी श्री.सालीमठ म्हणाले, धुळे येथे…
संगीत विशारद परीक्षेचा निकाल जाहीर : सारंग ढवळे बनला हळगावमधील पहिला मृदंग विशारद. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि १३ : मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत विशारद परीक्षेतील मृदंग या विषयात सारंग विठ्ठल ढवळे हा उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मृदंग विशारद ही पदवी संपादन करणारा सारंग ढवळे हा हळगावमधील पहिला विद्यार्थी ठरला आहे. जामखेड तालुक्यातील हळगाव येथील सारंग ढवळे याने करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयात शिक्षण घेतले आहे. संगीत विशारद नाना पठाडे यांच्याकडे मार्गदर्शनाखाली त्याने मृदंगाचे शिक्षण घेतले. सात वर्षे तो या विषयाचे प्रशिक्षण घेत होता. सलग सात…
७ मार्चपर्यंत शिर्डी शहरातील अवजड व तत्सम वाहतूक पर्यायी मार्गाने समृद्ध नगर न्यूज नेटवर्क अहिल्यानगर दि.१२- शिर्डी शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या नगर-मनमाड रोडवरील वाढत्या ट्रॅफिकमुळे आणि भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि शहरातील नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्र. अपर जिल्हादंडाधिकारी अतुल चोरमारे यांनी शिर्डी शहरातील अवजड व तत्सम वाहतूक दि. ११ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२५ या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. लक्ष्मीनगर टी पॉईंट, अहिल्यानगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) ते आर.बी.एल. बँक चौक, नगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) जाणारी अवजड वाहतूक हॉटेल ऋषिकेश, १८ मीटर रिंगरोड ते आर.बी.एल. बँक…