Author: Samrudha Nagar

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

शिवसेना शिंदे पक्षाकडून मोफत ब्युटी पार्लर कोर्सला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – जयश्री नितीन कोल्हे व नितीन भाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्सच्या पहिल्याच दिवशी महिलांचा उत्स्फूर्त व उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. महिलांना स्वावलंबी बनविणे व त्यांच्यातील कौशल्यांना चालना देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून परिसरातील अनेक महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या कोर्समध्ये ब्युटी पार्लर व्यवसायासंबंधी मूलभूत तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्वचा निगा, केसांची निगा, मेकअप तंत्र, फेशियल, थ्रेडिंग, मेहेंदी, तसेच पार्लर व्यवस्थापन यांसारख्या विविध विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर…

Read More

जिह्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने’ला गती‌ ! २ हजार २६८ शेत रस्त्यांचे मजबुतीकरण होणार ४ फेब्रुवारीला कामांच्या निविदा प्रसिद्ध होणार समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि.२९ :- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या कामांना वेग आला असून, यासाठी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार २६८ शेत रस्ते कामासाठी उपलब्ध असून, या प्रक्रियेत जास्तीत जास्त कंत्राटदार व यंत्र मालकांनी आपला सहभाग नोंदवून निविदा भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या…

Read More

अजित पवार: महाराष्ट्राचे ‘दादा’ — एक शक्तिशाली राजकीय व्यक्तिमत्त्व हरपले समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – विशेष लेख प्रारंभिक जीवन आणि पारिवारिक पार्श्वभूमीअजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील देवालाली प्रवरा या गावात झाला. ते राष्ट्रवादी कॉन्ग्रेस पार्टीचे (NCP) ज्येष्ठ नेता आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या कुटुंबाचे नाते मोठ्या राजकीय घराण्याशी होते; त्यांचे चुलते शरद पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आघाडीचे प्रभावशाली नेते आहेत. लहानपणापासूनच त्यांनी जबाबदारीची पाउस ओळखली — त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तरुण वयातच कुटुंबासाठी जबाबदारी उचलावी लागली. त्यांनी आपली प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देवराळी प्रवारा महाराष्ट्र बोर्डांतून पूर्ण केली. राजकीय प्रवासाची सुरुवात…

Read More

विमान अपघातात अजित पवार गंभीर jakhami उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बारामतीत लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याची माहिती असून विमानातील काही जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवारांची आज बारामतीत जाहीर सभा नियोजित होती. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

Read More

समृद नगर न्यूज नेटवर्क – विशेष बातमी शेतीसाठी आता 12 फुटांचा रुंद शेतरस्ते अनिवार्य.ट्रॅक्टर, ट्रॉली, हार्वेस्टरची वाहतूक सुलभ; गावोगावी शेतमार्ग होणार सुरक्षित व दर्जेदार— महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनराज्यातील शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचताना अरुंद व निकृष्ट शेतरस्त्यांमुळे भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महसूल व वन विभागाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार गावोगावी शेतीकडे जाणारे शेतरस्ते किमान ३ ते ४ मीटर (सुमारे १२ फूट) रुंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक भागांत शेतरस्ते अतिशय अरुंद असल्याने ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटाव्हेटर, सीड ड्रिल, हार्वेस्टर यांसारखी मोठी कृषी अवजारे शेतात नेणे कठीण होत होते. परिणामी शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि इंधनखर्च वाढत होता. काही…

Read More

जवळा परिसरातील ज्येष्ठ वैद्यकीय सेवक डॉ. गोविंद सिताराम रासने यांचे निधन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – जवळा, नान्नज, हाळगाव आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांचे आधारवड ठरलेले ज्येष्ठ वैद्यकीय सेवक डॉ. गोविंद सिताराम रासने यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सेवाभावी, प्रामाणिक आणि लोकाभिमुख डॉक्टर हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सुमारे ७० वर्षांपूर्वी डॉ. रासने यांनी जवळा भागात वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. त्या काळात ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव असताना त्यांनी निस्वार्थ भावनेने वैद्यकीय व्यवसाय स्वीकारला. सलग चार दशकांहून अधिक काळ त्यांनी जवळा, नान्नज, हाळगाव आणि आसपासच्या गावांमध्ये आरोग्य सेवा दिली. त्या काळात या संपूर्ण…

Read More

​‘महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन’ मधून उद्योजकता,‌ निर्यातवाढीस चालना मिळेल‌ – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते ​समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – , दि. २२ : उद्योगांना प्रोत्साहन देऊन आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आयोजित ‘महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन २०२६’च्या माध्यमातून उद्योजकता व निर्यातवाढीस निश्चित चालना मिळेल, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी व्यक्त केला. शहरातील हॉटेल यश ग्रँड येथे ‘महा निर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. गिते बोलत होते.​कार्यक्रमास उद्योग विभागाच्या सहसंचालक वृषाली सोने, प्रादेशिक संचालक डॉ. विवेक बक्षी, महाव्यवस्थापक दीपक शिवदास, जयद्रत खताळ, अरविंद पारगावकर, हरजितसिंग वाधवा, अरुण खामेरे, उद्योग अधिकारी अशोक बेनके, श्याम बिराजदार आदी उपस्थित…

Read More

सभापती मोहन पवार यांच्यावतीने मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन.नगरसेवक मोहन पवार व राजश्री पवार यांचा सामाजिक उपक्रमजामखेड समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक तसेच सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार व त्यांच्या सौभाग्यवती राजश्री पवार यांच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री नागेश विद्यालयाच्या पाठीमागे, संतोषीमाता मंदिराजवळ, जामखेड येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पत्नी माजी सभापती आशा शिंदे तसेच जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांची…

Read More

प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २० लाखांची खंडणीश्रीगोंदा पोलिसांकडून तिघे अटकेत; ५४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त. श्रीगोंदा समृद्ध नगर न्यूज नेटवर्क -: प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्हॉट्सअ‍ॅपद्वारे २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ५४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात वैभव आसाराम खंडके (वय २७, व्यवसाय, रा. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दाखल केली होती. १ जानेवारी २०२६ पासून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवून प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली व २० लाख रुपयांची खंडणी मागितली.…

Read More

शिवरायांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जामखेडात स्मारक व्हावे : रोहिणीताई काशिद जामखेड शहरात भव्य स्मारक उभारण्याची महिला शिवजन्मोत्सव समितीची मागणी समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – -: राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या औचित्याने महिला शिवजन्मोत्सव समिती व शिवप्रेमींच्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौक येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे या मागणीसाठी आज रोजी जामखेड नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्याग, साहस, पराक्रम, दूरदृष्टी, नेतृत्व, न्यायप्रियता, राष्ट्रभक्ती आदी स्वराज्याच्या संकल्पनेने भावी पिढ्यांना त्यांच्या विचारांची प्रेरणा घेता यावी, यासाठी जामखेड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीच्या चौकात छत्रपतींचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने…

Read More