Author: Samrudha Nagar

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी समृद्ध नगर न्यूज नेटवर्क अहिल्यानगर दि.१२- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्शन मोडवर येरवडा-कात्रज भुयारी मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्ध नगर न्यूज नेटवर्क मुंबई, दि. 12 : पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिले. पुण्यासोबतच नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजी नगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली. प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी 636.84 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी २०३ कोटी रुपयांचा…

Read More

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर असलेल्या युवापिढींना सावरण्याचे साहित्यिकांमध्ये सामर्थ्य – डॉ. रविंद्र शोभणे ▪️दिल्ली येथील अगामी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साधला संवाद नागपूर, दि.11 : जगातल्या कोणत्याही साहित्याची पाने उलगडून पाहिली तर त्यात समाज जीवनाच्या सुख-दु:खाचे, मानवी भाव विश्वाचे प्रतिबिंब आपल्या भेटीला येते. एखादी कादंबरी, कथा, कविता, गझलेचा शेर हा या भावभावनेचा साक्षात्कार असतो. हा साक्षात्कार जगण्याला सकारात्मकतेची प्रेरणा देणारा असतो. अलिकडच्या काळात आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर असलेल्या युवापिढींना सावरण्याचे सामर्थ्य हे साहित्यिकांमध्ये, कविमध्ये आहे असे नि:संदिग्ध प्रतिपादन 97 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांनी केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य…

Read More

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अधिकचा निधी देण्यात येईल-उपमुख्यमंत्री अजित पवार समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि. ११- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२५-२६ अंतर्गत प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर नियतव्ययापेक्षा अधिकचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही श्री.पवार यांनी यावेळी दिली. बैठकीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, शिवाजीराव गर्जे, आमदार किरण लहामटे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा, अहिल्यानगरचे पालक सचिव प्रवीण दराडे आणि अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित…

Read More

ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपला ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांंजली समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. ११:- मराठीतील ग्रामीण साहित्य चळवळीचा पैस वाढवणारे, नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि बळ देणाऱ्यांत बिनीचे शिलेदार ठरतील अशा प्रा. रा. रं. बोराडे यांचे निधन या चळवळीची हानी आहे,अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीणकथाकार प्रा. रा. रं बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रा. बोराडे यांना जाहीर झालेला विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यापुर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला, हे दुख:द असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात,’पाचोळाकार’ म्हणून लोकप्रियता मिळविणारे प्रा. बोराडे मराठीचे अध्यापन, साहित्य चळवळ…

Read More

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, दहावी बारावी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला मुंबई दि ११: दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारी बाबत…

Read More

अहिल्यानगर जिल्ह्याचा ‘आनंददायी परीक्षा पॅटर्न’ आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर परिक्षेला सामोरे जाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि.१०- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर परीक्षेला सामोरे जावे आणि यश संपादन करावे, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. ‘आनंददायी परीक्षा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. बालपणापासून केलेल्या शिक्षण साधनेची ही परीक्षा असून अशा महत्त्वाच्या प्रसंगी आई – वडिल, शिक्षक आणि राज्यशासनही विद्यार्थ्यांसोबत असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जिल्हाधिकारी म्हणतात, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी लेखनातील मुद्देसूदपणा, एकाग्रता आणि अभ्यासातील सातत्य या त्रिसूत्रीच्या बळावर परीक्षा…

Read More

सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – राज्यपाल हरिभाऊ बागडे शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५ चे उद्घाटन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क shirdi दि.९ – सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व राज्य शासनाचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते‌. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार काशीनाथ दाते, सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, राज्य सहकारी पतसंस्था…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य देशवासियांसाठी प्रेरणादायी- प्रा. राम शिंदे समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये   समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांचे हे कार्य  संपूर्ण देशवासियांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन  महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. चौंडी येथे लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समिती व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा.शिंदे बोलत होते. यावेळी राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे, बीजमाता राहीबाई पोपेरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, माजीमंत्री अण्णासाहेब…

Read More

ग्रामीण अर्थव्यवस्थेला आर्थिक स्थैर्य व पोषण सुरक्षा देणारी पशुगणना समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पशुपालन ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे लाखो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य आणि पोषण सुरक्षा मिळण्यास मदत होते. पशुपालन हा कृषी कुटुंबासाठी पूरक उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आणि भूमिहिन कुटुंबासाठी उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत आहे. पशुधनाच्या संख्येबाबत सर्वसमावेशक माहिती गोळा करण्यासाठी पशुगणना हे महत्त्वाचे साधन आहे. देशामध्ये १९१९ सालापासून पशुगणनेला सुरुवात करण्यात आली. दर पाच वर्षातून एकवेळेस ही पशुगणना करण्यात येते. आतापर्यंत २० पशुगणना करण्यात आल्या असून २१ व्या पशुगणनेला नोव्हेंबर २०२४ पासून सुरुवात करण्यात आली असून पशुधन क्षेत्र सुधारण्यासाठीच्या कार्यक्रमांचे योग्य नियोजन…

Read More