Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»कृषी योजनांची जनजागृती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील.
    ताज्या बातम्या

    कृषी योजनांची जनजागृती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 15, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    कृषी योजनांची जनजागृती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – , दि. १५ : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी कृषी विभागाने योजनांची जनजागृती थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करावी, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

    ​राहाता तालुक्यातील पिंपळवाडी, रामपूरवाडी, आडगाव, नांदूर, शिर्डी व पुणतांबा अशा गावांमधील ११ शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ‘कम्बाईन हार्वेस्टर’साठी निवड झाली आहे. या मंजूर हार्वेस्टरचे वितरण पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

    तालुक्यातील कृषी यांत्रिकीकरणाच्या सद्यस्थितीची माहिती देताना पालकमंत्री म्हणाले , या योजनेसाठी तालुक्यातील १३ हजार २४१ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. आतापर्यंत २२५ शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा लाभ घेतला असून, त्यासाठी २ कोटी ७२ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. तसेच, ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी ७१४ शेतकऱ्यांची निवड झाली असून, यासाठी ६ कोटी ६७ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
    ​प्रयोगशील शेतीला बळ देणार.


    कृषी विकासाला गती देताना नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विविध योजनांची अंमलबजावणी होत आहे. शिर्डी व राहाता परिसरातील शेतकरी प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून प्रगती करत आहेत. या प्रयत्नांना शासकीय योजनांचे भक्कम पाठबळ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने केवळ गावातच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून काम करावे, असे निर्देश डॉ. विखे पाटील यांनी दिले.

    ​यावेळी राहाता नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, मंडल अधिकारी रमेश चोपडे, अभय बोरसे, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.


    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.