Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»दादा, तुम्ही वेळ चुकवलीत…’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट
    ताज्या बातम्या

    दादा, तुम्ही वेळ चुकवलीत…’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 31, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    दादा, तुम्ही वेळ चुकवलीत…’ — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक श्रद्धांजली

    मंत्रिमंडळ बैठकीतील शेवटच्या भेटीपासून विमानप्रवासातील आठवणींपर्यंत; अजित पवारांबद्दल फडणवीस यांनी व्यक्त केली हळवी खंत

    मुंबई : “दादा, आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती… यावेळी मात्र चुकवलीत,” या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जिवलग मित्राला आणि सहकाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने वैयक्तिक तसेच राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी त्यांनी अत्यंत हळव्या शब्दांत मांडली.
    मंगळवारी (दि. २७ जानेवारी) मंत्रिमंडळ बैठकीत आणि त्यानंतर पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत अजित पवार यांच्यासोबत झालेल्या शेवटच्या भेटीची आठवण फडणवीस यांनी सांगितली. राज्यातील पायाभूत सुविधांवरील खर्च, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची गरज आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने वाचविलेल्या ७६४ कोटी रुपयांवर दोघांमध्ये चर्चा झाली होती. “अशाच गोड बातम्या प्रत्येक बैठकीत देत जा,” अशी कोपरखळी दादांनी मारली होती, असे त्यांनी नमूद केले.
    बुधवारी सकाळी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताची बातमी ऐकूनही इतके विपरीत घडेल, असे वाटले नव्हते, असे सांगताना फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी झालेल्या संवादाचाही उल्लेख केला. “डॉक्टर काही सांगत नाहीत, तोवर मन विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण अखेर ती वाईट बातमी आलीच,” असे ते म्हणाले.
    २०१९ पासून अधिक जवळून काम करत असलो, तरी त्यापूर्वीही विकासाच्या विषयांवर आमचे एकमत असे, असे त्यांनी सांगितले. अजित पवार हे शब्दाला जागणारे, निर्णयक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. ‘पाहतो, करतो’ ही शैली त्यांना मान्य नव्हती; होकार किंवा नकार, एवढीच स्पष्ट भूमिका ते घेत, असे त्यांनी अधोरेखित केले.
    राजकारणापलीकडील मैत्रीचे अनेक किस्से त्यांनी सांगितले. क्रिकेट सामने, गाण्यांची आवड, उशिरापर्यंत चालणाऱ्या गप्पा, आणि त्यातही कामाची यादी हातात ठेवणारे दादा, अशी आठवण त्यांनी सांगितली. बांधकामाच्या गुणवत्तेबाबत त्यांची काटेकोर भूमिका, सकाळी सहालाही प्रत्यक्ष पाहणी करण्याची सवय, तसेच बारामती मेडिकल कॉलेजच्या बांधकामावर त्यांनी ठेवलेली वैयक्तिक नजर याचाही उल्लेख त्यांनी केला.
    हेलिकॉप्टर किंवा विमानप्रवासात दादांना दूध पिण्याची आवड होती, तसेच एकदा विमानप्रवासात अपघातांच्या आठवणी सांगताना त्यांनी पायलटला गंमतीने ‘धावपट्टी दिसते का’ असे विचारल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. “त्याच दादांना विमान अपघाताने आपल्यातून हिरावून न्यावे, ही शोकांतिका आहे,” असे ते म्हणाले.
    “हा माझा वैयक्तिक तोटा तर आहेच; पण महाराष्ट्राचेही मोठे नुकसान आहे. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.