Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026
    Facebook Twitter
    Thursday, July 30
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»डॉ. हृतिक घोलप एम.डी. (बालरोग) साठी नागपूरमध्ये प्रवेश
    समृद्ध नगर विशेष

    डॉ. हृतिक घोलप एम.डी. (बालरोग) साठी नागपूरमध्ये प्रवेश

    Samrudha NagarBy Samrudha NagarFebruary 20, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    डॉ. हृतिक घोलप यांना एम.डी. (बालरोग) साठी नागपूरमध्ये प्रवेश

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
    कुटुंबीयांचा अभिमान; परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव
    प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत डॉ. हृतिक यांना एम.डी. (बालरोग तज्ञ) अभ्यासक्रमासाठी NKP Salve Institute of Medical Sciences & Lata Mangeshkar Hospital, नागपूर येथे प्रवेश मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


    डॉ. हृतिक यांनी एमबीबीएस शिक्षण पूर्ण करताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. बालरोग तज्ञ होण्याचे स्वप्न त्यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच मनात बाळगले होते. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी एम.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून आपल्या कुटुंबाचा, गुरुजनांचा आणि परिसराचा अभिमान वाढवला आहे.


    डॉ. हृतिक यांनी सांगितले की, “बालरोग तज्ञ म्हणून काम करताना समाजातील लहान मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि गरजू कुटुंबांना योग्य वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.” त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि मित्रांच्या पाठिंब्याला दिले.

    चांगला डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी – डॉ अविनाश घोलप
    डॉ. हृतिक यांच्या वडिलांनी आनंद व्यक्त करत सांगितले, “मुलाने घेतलेले कष्ट आज फळाला आले आहेत. आमच्या कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. त्याने चांगला डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी, हीच आमची अपेक्षा आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही सदैव त्याच्या पाठीशी आहोत.”डॉ अविनाश घोलप


    जवळा व करमाळा परिसरातून अभिनंदन
    डॉ. हृतिक यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मोठे ध्येय साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
    डॉ. हृतिक घोलप पुढील काळात उत्कृष्ट बालरोग तज्ञ बनून समाजसेवेचे ध्येय पूर्ण करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    चार दिवसांचे कार्यक्रम नकोत; कायमस्वरूपी स्मरण राहील असा निर्णय घ्या’, सरकारसमोर रोहित पवारांची अपेक्षा

    July 14, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026

    मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; दरोड्यासह १० गुन्ह्यांची उकल

    July 15, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.