Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»जे नेते लोकांच्या संपर्कात नव्हते, त्यांनाही जिल्हापरिषदेचे स्वप्न ?
    समृद्ध नगर विशेष

    जे नेते लोकांच्या संपर्कात नव्हते, त्यांनाही जिल्हापरिषदेचे स्वप्न ?

    Samrudha NagarBy Samrudha NagarOctober 18, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

     जे लोकांच्या संपर्कात नव्हते, त्यांनाही जिल्हापरिषदेचे स्वप्न ?

    सोशल मीडियावर भावीची भाऊ गर्दी, आरक्षण जाहीर झाल्याने कार्यकर्ते लागले कामाला,

    भाजप राष्ट्रवादी मध्ये होणार काटेकी टक्कर, मित्र पक्षांची भूमिका राहणार निर्णायक

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि १८ –

                                       जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाल्याने सर्वच पक्षाचे इच्छुक कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर तर भावी ची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. जे लोकांच्या संपर्कात नव्हते ते ही इच्छुकांच्या यादी येत असल्याचे दिसत आहे.

     जिल्हापरिषद व पंचायत समितीची निवडणूक आ रोहित पवार यांच्यासाठी पहिल्यांदाच असल्याने या निवडणुकीत त्यांची खरी कस लागणार आहे. तर सभापती प्रा राम शिंदे यांना जिल्हापरिषद व गणांचा बारकाईने अभ्यास असल्याने या होऊ घातलेल्या निवडणुकीत कितपत यश येणार हे पाहणे अस्तुक्याचे ठरणार आहे.

                             जामखेड पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण ओबीसी महिला आहे. आरणगाव गणात ओबीसी महिला साठी आरक्षण  पडले असल्याने त्या गणाला महत्वप्राप्त झाले आहे. त्यामुळे सभापती पदाचा मान हा आरणगाव गणाला जाणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

                                 जामखेड तालुक्यात  तीन जिल्हा परिषद गट असून सहा पंचायत समिती गण आहेत. यामध्ये साकत, जवळा, खर्डा अनुक्रमे तीन जिल्हा परिषद गट आहे. तसेच सहा पंचायत समिती गणामध्ये जवळा, अरणगाव, साकत, खर्डा, दिघोळ, शिऊर हे पंचायत समिती गण आहेत. यामध्ये जवळा जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे.तर साकत , खर्डा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आहे. तसेच या गट व गणांच्या आरक्षणाने कही खुशी कही गम झाल्याचे दिसत आहे. 

                      तसेच पंचायत समिती गण मध्ये जवळा  गण हा अनुसूचित जाती  महिलासाठी राखीव झाले आहे. तसेच अरणगाव गण हा ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. तसेच पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. उर्वरित 3 गण  साकत खर्डा आणि शिऊर हे तीनही पंचायत समिती गण सर्वसाधारण  असल्याने अनेक इच्छुकांचे चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत आहे.

    जवळा जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला पडल्याने अनेक इच्छुक कामाला लागले आहे. जवळा जिल्हापरिषद गटामध्ये भाजप सह राष्ट्रवादी मध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी असल्याचे पहिला मिळत आहे.जवळा गटात भाजप  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाकडून देखील मोठ्याप्रमाणात इच्छुक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

    तसेच खर्डा व साकत हे गट सर्वसाधारण असल्याने या दोन्ही गटात मोठ्याप्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी सोशल मिडिया सक्रिय केली आहे. जे लोकांच्या संपर्कात नव्हते ते ही इच्छुकांच्या यादी येत स्वतःच इच्छुक असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे.

    चौकट 

    जवळा गणात सलग दुसऱ्यांदा अनुसूचित जातीचे आरक्षण

    जवळा गणात सलग दुसऱ्यांदा अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले आहे. सन 2017 च्या निवडणुकीत देखील अनुसूचित जातीसाठी सर्व साधारण होते मागील वर्षीचे सभापती पदाचे सुरुवातीचे अडीच वर्षाचे आरक्षण देखील अनुसूचित जातीसाठीच राखीव होते. 

    आरक्षण गट

    जवळा – ओबीसी महिला

    खर्डा – सर्वसाधारण 

    साकत- सर्वसाधारण

    गणाचे आरक्षण.

    जवळा – अनुसूचित जाती

    आरणगाव- महिला ओबीसी

    दिघोळ – सर्वसाधारण महिला

    खर्डा –  सर्वसाधारण

    साकत – सर्वसाधारण शिऊर – सर्वसाधारण

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.