Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»समाजकल्याण वसतीगृहातील माजी विद्यार्थ्याची तालुका कृषी अधिकारी पदावर निवड
    समृद्ध नगर विशेष

    समाजकल्याण वसतीगृहातील माजी विद्यार्थ्याची तालुका कृषी अधिकारी पदावर निवड

    Samrudha NagarBy Samrudha NagarFebruary 12, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    समाजकल्याण वसतीगृहातील माजी विद्यार्थ्याची तालुका कृषी अधिकारी पदावर निवड

    ​समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. ११ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, संगमनेर येथील माजी विद्यार्थी तुषार सूर्यभान साळवे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तालुका कृषी अधिकारी (वर्ग–१/गट-ब) या पदावर निवड झाली आहे.

    ​ साळवे यांनी समाजकल्याण वसतीगृह, संगमनेर येथे वास्तव्यास असताना स्पर्धा परीक्षेची तयारी केली. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास व जिद्दीच्या बळावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

    ​या यशामागे वसतीगृहातील संस्कार, मार्गदर्शन व प्रेरणादायी वातावरणाचा मोठा वाटा आहे. तसेच, विद्यार्थ्यांना आपुलकीने जपणाऱ्या दीपाली गांगुर्डे (स्वयंपाकी), मार्गदर्शक श्री. महानोर व अनिल गर्जे तसेच वसतीगृहातील इतर कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले.

    ​या यशाबद्दल समाजकल्याण आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ, प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी श्री. साळवे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

    ​श्री. साळवे यांच्या या यशामुळे समाजकल्याण विभागाचा गौरव वाढला असून, ही यशोगाथा वसतीगृहातील तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.