Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»जामखेड तालुक्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई;
    समृद्ध नगर विशेष

    जामखेड तालुक्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई;

    Samrudha NagarBy Samrudha NagarMay 21, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    जामखेड तालुक्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई;

     सहकार विभागाच्या एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी!

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची धडक कारवाई; तीन ठिकाणी छापे, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. जामखेड तालुक्यात अवैध सावकारीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागाने पोलिस प्रशासनाच्या मदतीने मोठी धडक कारवाई केली. तालुक्यात एकाच वेळी 3 ठिकाणी छापे टाकत अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत कोरे धनादेश, खरेदीखते तसेच इतर आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यात  अवैध सावकारी सुरू असल्याबाबत प्रशासनाकडे आवश्यक कागदपत्र सह   तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, विभागीय निबंधक संभाजी निकम आणि जिल्हा निबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक निबंधक तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश करून , जामखेड चे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या समन्वयाने विविध पथके तयार करून सदरची  कारवाई केली.

     महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 च्या कलम 16 अन्वये ही कारवाई करण्यात आली. सहकार विभागाचे 16 अधिकारी-कर्मचारी आणि पोलिस दलाचे 6 अधिकारी-कर्मचारी अशा 22 जणांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दोन संशयित ठिकाणांवर छापे टाकले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अवैध सावकारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

    छाप्या दरम्यान कोरे धनादेश (Blank Cheques), खरेदीखते (Sale Deeds) , आर्थिक नोंदी असलेल्या वह्या, तसेच इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. या कागदपत्रांच्या आधारे पुढील तपास आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे. सहकार विभागाने तालुक्यातील सर्व नागरिकांना अवैध सावकारीविरोधात  सहाय्यक निबंधक कार्यालय, जामखेड येथे  आवश्यक कागदपत्रासहा तक्रार दाखल केल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.