Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»जामखेड–सौताडा रस्त्याच्या कामात अडथळा आणल्यास कडक कायदेशीर कारवाई,
    समृद्ध नगर विशेष

    जामखेड–सौताडा रस्त्याच्या कामात अडथळा आणल्यास कडक कायदेशीर कारवाई,

    Samrudha NagarBy Samrudha NagarDecember 20, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    जामखेड–सौताडा रस्त्याच्या कामात अडथळा आणल्यास कडक कायदेशीर कारवाई

    जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा इशारा; संथ कामाबाबत अधिकाऱ्यांची झाडाझडती

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि १८ –

    गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जामखेड–सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे जामखेड शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. विशेषतः शहरातील मुख्य असलेल्या खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल या अंतर्गत रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असून नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जामखेड तहसील कार्यालयात संबंधित सर्व विभागांचे अधिकारी व ठेकेदार यांची तातडीची आढावा बैठक घेतली.

    बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामातील दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकारी व ठेकेदारांची चांगलीच झाडाझडती घेतली. “हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पूर्ण झाला पाहिजे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणारा कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सूचना दिल्या.

    रस्त्याच्या कामात कोणीही अडथळा निर्माण करत असल्यास ठेकेदारांनी तात्काळ पोलिस संरक्षण घ्यावे व अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कामात अडथळा, हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

    या बैठकीस तहसीलदार धनंजय बांगर, गटविकास अधिकारी शुभम जाधव, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शशिकांत सुतार, तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले, सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे, महावितरणचे चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल हा रस्ता अनेक महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आल्याने वाहनचालक, विद्यार्थी, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले असून काही नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले असल्याच्या तक्रारीही यावेळी मांडण्यात आल्या. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

    उपजिल्हा रुग्णालय व स्ट्रॉंग रूमची पाहणी

    याच दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जामखेड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून ठेकेदारांना काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच आगामी निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून सुरक्षिततेबाबत समाधान व्यक्त केले.

    २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. महसूल, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती, महावितरण, नगरपरिषद आदी सर्व विभागांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

    चौकट : जिल्हाधिकाऱ्यांचा जामखेड दौरा

    जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या झिक्री (ता. जामखेड) येथील शेतकरी चंद्रकांत आजबे यांच्या फळबागेची पाहणी केली. तसेच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचनालय, नगरपरिषद जामखेड व नगरपरिषद निवडणुकीच्या स्ट्रॉंग रूमला भेट देऊन पाहणी केली. जामखेड–सौताडा महामार्गाबाबत तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी कर्जत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भूमी अभिलेख उपअधीक्षक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. तसेच तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल

    August 23, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.