माजी विद्यार्थी प्रशांत रोडे व त्यांच्या सहकारी यांच्या पुढाकारातून ‘डिजिटल जवळा’कडे महत्त्वपूर्ण पाऊल
जवळा, ता. जामखेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळा येथे अत्याधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शाळेचे माजी विद्यार्थी तथा गावचे सुपुत्र प्रशांत मारुती रोडे यांच्या विशेष पुढाकारातून आणि एचपीडी डिझायनिंग कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून शाळेला ६ संगणकांची भेट देण्यात आली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने हा उपक्रम साकारण्यात आला. या संगणक लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक हाताळणी, टायपिंग, डिजिटल अध्ययन, शैक्षणिक सॉफ्टवेअरचा वापर, माहितीचा शोध, शैक्षणिक व्हिडिओ तसेच विविध डिजिटल साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

उद्घाटन सोहळ्यास मा. पराग पाठक, डायरेक्टर; मा. प्रशांत हुद्रार, डायरेक्टर; सुभाष कुमार, आयटी अॅडमिनिस्ट्रेटर; तसेच प्रशांत रोडे, रिजनल डिझाइन लीड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी धनंजय बोदार्डे, शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ व केंद्र समन्वयक योगेश खेडकर उपस्थित होते.
यावेळी अजिनाथ हजारे, प्रशांत शिंदे, सुशील आव्हाड, संताराम सूळ, संदेश हजारे, राजेंद्र पवार, महादेव पवार, मारुती रोडे, विष्णू हजारे, राजेंद्र राऊत, दिपक पाटील, प्रशांत पाटील, अशोक पठाडे, राहुल पाटील, किसन सरोदे, गौतम कोल्हे, उमेश रोडे, अनिल सरोदे, संजय हजारे, नवनाथ हजारे, अविनाश पठाडे, संदीप काढणे, महेंद्र खेत्रे, संदीप कोल्हे, निखिल हजारे व मुकुंद रोडे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

प्रशांत रोडे म्हणाले…
«“ज्या शाळेने मला घडवले, त्या शाळेसाठी काहीतरी देणे ही माझी जबाबदारी आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हातात संगणक देणे म्हणजे त्यांच्या हातात भविष्यातील संधी देणे होय. या लॅबमधून विद्यार्थी मोठी स्वप्ने पाहतील आणि ती साकार करण्यासाठी आवश्यक डिजिटल कौशल्ये आत्मसात करतील, असा मला विश्वास आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास हजारे यांनी केले, तर बाळासाहेब रोडे यांनी आभार मानले. जवळा शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील हा उपक्रम ‘डिजिटल जवळा’कडे टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.
