Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026
    Facebook Twitter
    Thursday, July 30
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»गोरगरीबांचे देवदूत डॉ. गोविंद रासने यांचे निधन.
    ताज्या बातम्या

    गोरगरीबांचे देवदूत डॉ. गोविंद रासने यांचे निधन.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 26, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    जवळा परिसरातील ज्येष्ठ वैद्यकीय सेवक डॉ. गोविंद सिताराम रासने यांचे निधन

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
    जवळा, नान्नज, हाळगाव आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांचे आधारवड ठरलेले ज्येष्ठ वैद्यकीय सेवक डॉ. गोविंद सिताराम रासने यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सेवाभावी, प्रामाणिक आणि लोकाभिमुख डॉक्टर हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


    सुमारे ७० वर्षांपूर्वी डॉ. रासने यांनी जवळा भागात वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. त्या काळात ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव असताना त्यांनी निस्वार्थ भावनेने वैद्यकीय व्यवसाय स्वीकारला. सलग चार दशकांहून अधिक काळ त्यांनी जवळा, नान्नज, हाळगाव आणि आसपासच्या गावांमध्ये आरोग्य सेवा दिली. त्या काळात या संपूर्ण परिसरात वैद्यकीय सेवा देणारे ते एकमेव डॉक्टर होते.


    डॉ. रासने हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. गोरगरीब, गरजू रुग्णांसाठी ते देवदूत ठरले. अनेकदा रुग्णांकडून फी न घेता उपचार करणे, गरज पडल्यास रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी करणे, रात्री-अपरात्री मदतीला धावून जाणे हे त्यांच्या सेवाभावाचे उदाहरण होते. त्यामुळेच त्यांनी हजारो कुटुंबांचा विश्वास जिंकला होता.


    वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही योगदान दिले. सन १९९७ मध्ये पंचायत समिती जवळा गणातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून ते विजयी झाले. त्या निवडणुकीत त्यांनी भाजपाचे प्रा. राम शिंदे यांचा पराभव केला होता. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा लाभला.


    डॉ. रासने यांच्या निधनाने परिसरातील एक सेवायुग संपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याची आठवण गावोगावी कृतज्ञतेने केली जात आहे.
    त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    चार दिवसांचे कार्यक्रम नकोत; कायमस्वरूपी स्मरण राहील असा निर्णय घ्या’, सरकारसमोर रोहित पवारांची अपेक्षा

    July 14, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026

    मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; दरोड्यासह १० गुन्ह्यांची उकल

    July 15, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.