Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»महाराष्ट्र»निवडणूक»मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम.
    निवडणूक

    मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 1, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. १ : आगामी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीचे काम अत्यंत अचूक व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठी मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवून विहित वेळेत अंतिम मतदारयादी निर्दोष प्रसिद्ध करावी, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

    शिर्डी येथे ‘ २२३ – राहुरी विधानसभा ‘ मतदारसंघाची पोटनिवडणूक व विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

    श्री. चोक्कलिंगम म्हणाले, सध्याच्या मतदारयादीतील नावांचे २००२ च्या यादीशी जास्तीत जास्त ‘मॅपिंग’ करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात केवळ उर्वरित मतदारांचेच आवश्यक पुरावे घ्यावे लागतील. तसेच मतदारयादीतील दुबार नावे व ८५ वर्षांवरील मतदारांच्या नावांची तात्काळ पडताळणी करून याद्या अद्ययावत कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

    मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे किंवा तपशीलात दुरुस्ती करणे यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांवर वेळेतच निर्णय घेणे बंधनकारक आहे. विशेषतः राहुरी मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान येणाऱ्या अर्जांची योग्य ती पडताळणी करून अंतिम मतदारयादी निर्दोष प्रसिद्ध होईल, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही श्री.चोक्कलिंगम यांनी दिल्या.

    यावेळी त्यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.