Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026
    Facebook Twitter
    Tuesday, April 28
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»Uncategorized»जामखेड–सौतडा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा. अन्यथा आंदोलन.
    Uncategorized

    जामखेड–सौतडा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा. अन्यथा आंदोलन.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 5, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    जामखेड–सौतडा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

    १० दिवसांत काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि. ५ :

    जामखेड–सौतडा राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. या रखडलेल्या कामामुळे जामखेड शहर व तालुक्यातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

    सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोदकाम करून काम अर्धवट सोडण्यात आल्याने ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी वारंवार वाहतूक कोंडी होत असून शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांना वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात वाढले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे स्थानिक व्यापारावरही विपरीत परिणाम झाला असून विकास कामांना खीळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

    या गंभीर बाबी लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जामखेड तालुका अध्यक्ष प्रा. प्रशांत जालिंदर राळेभात यांच्या वतीने जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाला तातडीने आदेश देऊन सदर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

    यावेळी शहाजी राळेभात, इस्माईल सय्यद, संदीप गायकवाड, निखिल घायतडक, डॉ. कैलास हजारे, सूर्यकांत सदाफुले, अमोल गिरमे, प्रवीण उगले, कुंडल राळेभात, सागर भोसले, लक्ष्मण गोरे, वैजनाथ पोले, बापू कार्ले, दादा महाडिक, इम्रान तांबोळी, रवींद्र आष्टेकर, अमोल लोहकरे, सचिन शिंदे, संदीप साबळे, सागर सदाफुले, संदीप अडाले, मनोज राळेभात, बिलाल शेख, मनोज कार्ले, नासिर चाचू सय्यद, गणेश गायकवाड, दादा शिंदे, गजानन ढवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, येत्या १० दिवसांच्या आत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास किंवा संबंधित प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नाही, तर समस्त जामखेडकर नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

    दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या कामाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    कांद्याच्या पिकाच्या आड अफूची शेती! बांधखडक येथे पोलिसांचा छापा; ६ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त २ जणांविरोधात गुन्हा

    March 12, 2026

    शेतीसाठी आता 12 फुटांचा रुंद शेतरस्ते अनिवार्य.ट्रॅक्टर, ट्रॉली, हार्वेस्टरची वाहतूक सुलभ; गावोगावी शेतमार्ग होणार सुरक्षित व दर्जेदार

    January 27, 2026

    सर्वसामान्य कुटुंबाला उमेदवारी देऊन निवडून आणण्याची ताकद फक्त भाजपकडे – नंदा होळकर.

    December 29, 2025

    Comments are closed.

    Our Picks

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026

    जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई.

    April 19, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.