Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026
    Facebook Twitter
    Monday, August 3
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»Uncategorized»शेतरस्ता वादाचा सामंजस्याने निकाल.
    Uncategorized

    शेतरस्ता वादाचा सामंजस्याने निकाल.

    Samrudha NagarBy Samrudha NagarFebruary 15, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    शेतरस्ता वादाचा सामंजस्याने निकाल

    सांगवी भुसार व मायगाव देवी येथे तहसीलदारांच्या प्रयत्नांना यश

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क शिर्डी, दि. १५ – कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार व मायगाव देवी येथे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शेतरस्ता वादाचा तहसीलदार महेश सावंत यांच्या मध्यस्थीने सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. वादी-प्रतिवादींनी एकत्र येत वादावर तोडगा काढल्याने समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.

    सांगवी भुसार येथे दोनदा न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरही वाद मिटला नव्हता. न्यायालयीन लढाई, वेळ आणि खर्चामुळे दोन्ही बाजूंना त्रास होत होता. अखेर महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन दोन्ही पक्षांना एकत्र बसवले आणि संवादातून सामंजस्य घडवून आणले. दोघांनीही मोठेपणा दाखवत शेतरस्ता खुला करण्यास सहमती दर्शवली. उपस्थित पंचमंडळींनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.

    मायगाव देवी येथेही अशीच परिस्थिती होती. विशेष म्हणजे, हा वाद जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या शेतीशी संबंधित होता. वादाच्या सुरुवातीला तणाव निर्माण झाला होता, मात्र तहसीलदारांच्या संयमी आणि संवेदनशील हस्तक्षेपाने दोन्ही पक्ष सहमत झाले. न्यायालयाच्या दारात गेल्याशिवाय वाद मिटवता येतो, हे लक्षात घेत त्यांनी शेतरस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला. शेवटी, वादी-प्रतिवादींनी एकमेकांना मिठी मारून समाधान व्यक्त केले.

    तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले की, “शेतरस्त्यांचे बरेचसे वाद हे गैरसमज व हट्टीपणामुळे वाढतात. न्यायालयीन प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असते. त्यामुळे प्रशासनाने संवाद आणि सामंजस्याच्या मदतीने वाद मिटवण्याचे धोरण राबवले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम सुरू आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास अशा अनेक वादांचे जागेवरच निराकरण होऊ शकते.” या घटनांमुळे प्रशासनाच्या समंजस हस्तक्षेपाने वाद मिटवता येतात, हा सकारात्मक संदेश ग्रामीण भागात गेला आहे. महसूल प्रशासनाच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    कांद्याच्या पिकाच्या आड अफूची शेती! बांधखडक येथे पोलिसांचा छापा; ६ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त २ जणांविरोधात गुन्हा

    March 12, 2026

    शेतीसाठी आता 12 फुटांचा रुंद शेतरस्ते अनिवार्य.ट्रॅक्टर, ट्रॉली, हार्वेस्टरची वाहतूक सुलभ; गावोगावी शेतमार्ग होणार सुरक्षित व दर्जेदार

    January 27, 2026

    जामखेड–सौतडा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा. अन्यथा आंदोलन.

    January 5, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026

    मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; दरोड्यासह १० गुन्ह्यांची उकल

    July 15, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.