Author: Samrudha Nagar

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

श्रीगोंदा येथील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची मंत्री निलेश राणेंनी घेतली भेट कुटुंबियांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि.५- श्रीगोंदा येथे झालेल्या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घरी भेट घेवून सांत्वन केले. या संदर्भात उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांचीही त्यांनी भेट घेतली, यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनामार्फत मदतीसाठी तातडीने प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.राणे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, तहसीलदार क्षितिजा वाघमारे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे आदी उपस्थित होते

Read More

बारावी आणि दहावीच्या परीक्षां कॉपीमुक्तच ? कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे…

Read More