Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»राजकीय»जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना
    राजकीय

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    Samrudha NagarBy Samrudha NagarApril 27, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : २७आ. रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जामखेड पंचायत समितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कृषी, महावितरण, महसूल आणि पंचायत समितीशी संबंधित विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.

    बैठकीत त्यांनी संबंधित विभागांशी निगडित नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेतल्या आणि त्या जागीच सोडविण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या.दरम्यान, अनेक कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. काही ठिकाणी कामातील त्रुटी आणि निष्काळजीपणावरून संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. “नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळालाच पाहिजे आणि प्रलंबित कामे लवकर पूर्ण झाली पाहिजेत,” अशी ठाम भूमिका आ. रोहित पवार यांनी आढावा बैठकीत मांडली.

    तसेच येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या तयारीचाही सखोल आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे आणि इतर आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध आणि प्रभावी कामकाज करण्याचे आदेश त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तत्परतेने प्रतिसाद द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    या बैठकीस बीडीओ, संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. एकूणच, या बैठकीतून नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून प्रशासनालाही अधिक गतिमान आणि जबाबदार बनण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    तुकाई उपसा जलसिंचन योजनेचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा; भैरवनाथ योजनेचा प्रस्ताव ऑगस्टअखेर सादर करा : सभापती प्रा. राम शिंदे

    June 17, 2026

    सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश, ₹ 300 कोटींचा निधी मंजूर.

    May 23, 2026

    उजनीच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार – अंकुशराव ढवळे

    February 9, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.