Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026
    Facebook Twitter
    Monday, August 3
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»आरोग्य»प्रशांत शिंदे यांच्यावतीने सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर, शिबिरात 100 पेक्षा जास्त रुग्णांची नेत्र तपासणी.
    आरोग्य

    प्रशांत शिंदे यांच्यावतीने सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर, शिबिरात 100 पेक्षा जास्त रुग्णांची नेत्र तपासणी.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 2, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर , शिबिरात 100 पेक्षा जास्त रुग्णांची नेत्र तपासणी
    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
    जामखेड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या पुढाकारातून सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


    या शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये १०० पेक्षा अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर 10 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी नेत्रालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे गरजू व वयोवृद्ध रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.


    याच अनुषंगाने, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या माध्यमातून ह.भ.प. ज्ञानेश्वर पठाडे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. सभापती प्रा. राम शिंदे यांच्या १ जानेवारी वाढदिवसानिमित्त आयोजित या कीर्तनास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सामाजिक बांधिलकी आणि अध्यात्मिक प्रबोधन यांचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    या उपक्रमांमुळे समाजातील सर्वसामान्य घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा तसेच सांस्कृतिक-आध्यात्मिक मूल्यांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

    या कार्यक्रमास भाजपा तालुका अध्यक्ष बापुराव ढवळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष पांडुरंग उबाळे, जवळा सरपंच सुशील आव्हाड, बोरला माजी सरपंच जालिंदर चव्हाण, बावी सरपंच राम पवार, चौंडी चेअरमन विशाल भांडवलकर, जवळा माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील, सुभाष रोडे, रफीक शेख, कल्याण आव्हाड, हरिदास हजारे, प्रेम आव्हाड, किसन सरोदे, कांतिलाल महारणवर, पत्रकार संतराम सूळ, भाजपा युवा नेते डॉ. दीपक वाळुंजकर, युवा नेते प्रशांत पाटील, सावता ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद कोल्हे, डॉ. ईश्वर हजारे, ज्येष्ठ नेते हबीब शेख, युवा नेते अमोल हजारे, जीवन रोडे, अजित लेकुरवाळे, अमोल पाटील, जाफर शेख, संदीप कोल्हे, शुभम हजारे, लखन हजारे, सुभाष धोत्रे, अशोक हजारे, अमित कोरे तसेच युवा उद्योजक तुषार काढणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    शेतकरी कर्जमाफी योजनेतील दोन्ही जाचक अटी हटवल्या, आमदार रोहित पवार यांच्या आदोलनाचे मोठे यश.

    July 10, 2026

    जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई.

    April 19, 2026

    जामखेड तालुक्यात चोरी, सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

    April 12, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026

    मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; दरोड्यासह १० गुन्ह्यांची उकल

    July 15, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.