Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026
    Facebook Twitter
    Thursday, April 30
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर आमदार रोहित पवार यांनी मुख्याधिकारी यांना झापले.
    ताज्या बातम्या

    नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर आमदार रोहित पवार यांनी मुख्याधिकारी यांना झापले.

    Samrudha NagarBy Samrudha NagarSeptember 19, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    नागरिकांचा संताप, आमदारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती*

    आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये आमसभा*

    नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर आमदार रोहित पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना झापले.

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – संदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त तक्रारी आमसभेत आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या… नगरपरिषद सीईओ यांच्यावर नागरिकांनी कामात केलेली अफरातफर, शहरातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट… कचरा उचलण्यात होणारी टाळाटाळ, शहरातील चिखलमय रस्ते, गटारी, सांडपाण्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, तुंबलेल्या गटारी, अनियमित सुटलेले पाणी, मच्छरांचा होणारा उपद्रव आदी विषयावर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं… हा पैसा जनतेचा असून अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे कर्तव्य असल्याची जाणीवही त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना करून दिली.कर्जतप्रमाणेच जामखेडमध्येही आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आमसभेत नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. अधिकाऱ्यांकडून कामे होत नाहीत, कामांसाठी पैशांची मागणी केली जाते, बोगस बिले काढण्यात आली, वर्षानुवर्षे चकरा मारुनही कामे मार्गी लागत नाहीत, साहेब त्रास देतात अशा अनेक तक्रारींचा पाढा यावेळी नागरिकांनी वाचला. आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत नागरिकांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

    आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी कर्जतमध्ये सलग आठ तास एका ठिकाणी बसून आमसभा घेतली आणि उपस्थित सर्व नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. तसाच प्रयत्न सलग दुसऱ्या दिवशी जामखेडमध्ये आमसभा घेऊन केला. येथेही आमदार रोहित पवार यांनी दुपारी बारा ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सलग नागरिकांना वेळ देत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि जागेवरच त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले. काही प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रांताधिकारी, बीडीओ, नायब तहसीलदार यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    आमसभा सुरु होण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी अतिवृष्टीमुळे जामखेड तालुक्यात झालेल्या नुकसानीची काही गावांमध्ये जाऊन पाहणी केली. आमसभेला सुरवात होताच झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आणि बंधाऱ्यांशेजारील भराव वाहून गेल्याने त्याचीही दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना दिल्या. तसेच पंचनामे करताना नियमांचा बाऊ न करता कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना दिल्या.

    पंचायत समिती, कृषि विभाग, पोलिस विभाग अशा काही विभागांच्या कारभाराबाबत नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. सौताडा रस्त्याचे काम करताना गरीबांचे अतिक्रमण हटवण्यात आले मात्र काही ठरविक ठिकाणी रस्त्याचे काम रखडल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यावर येत्या आठ दिवसात उर्वरित अतिक्रमण काढून घेण्यात यावे यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून विशेष पथक मागवून घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. पंचायत समितीकडून रोजगार हमी हमी योजनेमार्फत करावयाची कामे ठप्प असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या. जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढत असूनही लसीकरण होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यावर अधिकाऱ्यांनी खोटी माहिती देताच आमदार रोहित पवार यांनी त्यांना फैलावर घेत तातडीने लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले.

    नागरिकांनी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून कामे करण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी आमसभेतच तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांचेही कान टोचले. कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांना त्रास न देता सहानुभूतीच्या भावनेतून त्यांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. 

    चौकट

    नागरिकांना होणारा त्रास पाहून आमसभेमध्ये अनेकदा आमदार रोहित पवार यांना अनेकदा संताप अनावर होत असल्याचे जाणवत होते, परंतु अशाही परिस्थितीत अधिकाऱ्यांची ‘सार्वजनिक पूजा-आरती’ नको म्हणून त्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. परंतु भविष्यात पुन्हा अशाच तक्रारी कायम राहिल्या तर लोकं ही माझीही ऐकणार नाहीत आणि जे घडेल त्याला पूर्णतः अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा मात्र त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळं भविष्यात प्रशासनाच्या काराभारात किती सुधारणा होते, हे पहावं लागेल.

    Sir Additional

    आमदारांच्या कार्यक्षमतेने अधिकाऱ्यांची तारांबळ
    राजकारणात काम करण्याबाबत ‘पवार’ नावाशी कुणीही बरोबरी करू नये, असे नेहमी बोलले जाते. मग त्यामध्ये शरद पवार असो, अजित पवार असो किंवा रोहित पवार असो. त्याचीच प्रचिती कर्जत आणि जामखेड या दोन्हीही ठिकाणी आली. दोन्ही दिवस झालेल्या आमसभेत आमदार रोहित पवार यांनी सलग ८ तास एका जागी बसून नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि जागीच त्याची सोडवणूक केली. परंतु हे करत असताना एक मिनीटही खुर्चीवरून न उठता सलग ८ तास एका जागी बसून काम करण्याच्या त्यांच्या क्षमतेची अधिकाऱ्यांमध्येही चर्चा सुरु होती. स्वतः आमदार एका जागी बसून लोकांचे प्रश्न मार्गी लावत असल्याने अधिकाऱ्यांनाही पळवाट काढता येत नव्हती. त्यामुळे दोन्ही दिवस हजारो लोकांचे प्रश्न मार्गी लागले. याबाबत नागरिकांनी आमदार रोहित पवार यांचे कौतुक केले आणि त्यांचे आभारही मानले.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026

    जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई.

    April 19, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.