Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांसाठी महत्वाची माहिती. – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आवाहन.
    ताज्या बातम्या

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांसाठी महत्वाची माहिती. – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आवाहन.

    Samrudha NagarBy Samrudha NagarNovember 20, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांसाठी महत्वाची माहिती. – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आवाहन.

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क  दि. २० :- जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीकडून इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.

    राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी संबंधित अधिनियमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेश व सूचनांनुसार उमेदवारांनी कार्य करणे आवश्यक आहे.

    सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रमाणीकरण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफ.एम. वाहिन्या, चित्रपटगृहे, बल्क एस.एम.एस., व्हॉइस एस.एम.एस., संकेतस्थळे आदींचा समावेश होतो.

    समाजमाध्यमे (सोशल मीडिया) यात इंटरनेटद्वारे वापरली जाणारी संवादाची व माहितीची व्यासपीठे समाविष्ट होतात, ज्याद्वारे लोक एकमेकांशी संवाद साधतात, माहिती शेअर करतात, प्रतिक्रिया व्यक्त करतात, मते किंवा विचार मांडतात आणि विविध प्रकारची माहिती (फोटो, व्हिडिओ, लेख, बातम्या) इतरांपर्यंत पोहोचवतात. उदा. एक्स (पूर्वीचे ट्विटर), फेसबुक, लिंक्डइन, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म्स, मायक्रो ब्लॉगिंग साइट्स, मेसेजिंग ॲप्स (व्हॉटसॲप, टेलिग्राम) तसेच कोलॅबोरेटिव्ह टूल्स (विकी, डिस्कशन फोरम्स) इत्यादींचा समावेश होतो.

    जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीत जिल्हाधिकारी  हे अध्यक्ष आहेत. या समितीत पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अपर जिल्हाधिकारी अथवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित तहसीलदार अथवा नगरपरिषद/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

    निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी प्रमाणीकरण करून घेण्यासाठी त्या जाहिराती जिल्हा माहिती अधिकारी (जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी रोड, अहिल्यानगर) यांच्याकडे सादर कराव्यात. प्रस्तावित जाहिरात प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या प्रमाणीकरणासाठी अर्ज करावा लागेल.

    पूर्व प्रमाणीकरणाच्या अर्जासोबत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती जोडाव्यात, असेही आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    तुकाई उपसा जलसिंचन योजनेचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा; भैरवनाथ योजनेचा प्रस्ताव ऑगस्टअखेर सादर करा : सभापती प्रा. राम शिंदे

    June 17, 2026

    सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश, ₹ 300 कोटींचा निधी मंजूर.

    May 23, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.